NC Times

NC Times

घाटनांद्रे येथील प्रतिष्ठित नागरिक बबन गंगाराम शिंदे यांचे दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):-घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील प्रतिष्ठीत नागरिक बबन गंगाराम शिंदे (वय-६८) यांचे रविवार दिनांक ३१ मार्च रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.ते महांकाली सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी होते.तर युवा नेते सचिन शिंदे यांचे वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सुना,जावई व नातवंडे असा परिवार असुन,रक्षा विसर्जन मंगळावर दिनांक २ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता घाटनांद्रे येथे घेण्यात आले आहे.