NC Times

NC Times

आरोग्यावर बोलू काही


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)                                                               घोरणे....                                          हा एक उष्णता विकार आहे.उष्णतेमुळे घशाला सूज येते.घशातील पडजिबेला सूज येते.पडजीभ ही जिभेच्या मागच्या बाजूला,वरच्या बाजूने लोंबणारी,वरची बाजू ४-५ मि.मी.जाडीची व लांबी सुमारे २ सेंमी.व खालची बाजू टोकदार अशी साधारणःत्रिकोणी आकाराची,स्नायूंची बनलेली असते.ज्यावेळी जीभ आत घेऊन 'आ' असा आवाज करतो तेव्हा इतर माणसांना ही पडजीभ नीट दिसते.तिच्या लोंबणाऱ्या टोकाला सूज येते.त्यामुळे तिची लांबी वाढते व ती झोपेत श्वसनमार्गात अडथळा निर्माण करते.त्यामुळे प्रत्येक उच्छवासाचे वेळी ती कंप पावते.त्यामुळे होणाऱ्या आवाजाला आपण घोरणे असे म्हणतो                                                           आपण 'घोरतो आहोत'हे ज्याचे त्याला समजत नाही.पण घरातील इतरांना त्रास होतो.त्यांची झोपमोड होते.काहींना भीती वाटते.त्यामुळे कुटुंबियांकडून तक्रार आल्यास व्यक्तीने लगेच उपचार सुरु करावेत    अंगठ्याच्या टोकाला थोडी हळदपूड घेऊन,तोंड उघडून,त्यावेळी अंगठा तोंडात ठेवून ती हळदीची पूड पडजिभेला लावावी.हे काम दिवसातून दोन-तीन वेळा करावे.हळद जंतुनाशक व सूजनाशक असल्याने हळद लावण्याचा फायदा होतो.                                 घशातील उष्णता कमी करण्यासाठी आपण घरात बनवतो ते साजूक तूप,मानेला बाहेरुन चोळावे.रोज दोनवेळा तूपाने घशातील सूज कमी होते. प्राणायमातील कपालभाती करण्याने अनेक फायदे होतात.त्यांने सर्व श्वसनसंस्था निरोगी राहते.             उशी न घेता झोपायची सवय करावी.सुरुवातीला २ इंच जाड उशी असेल तर हळुहळु तीची जाडी दीड इंच,नंतर एक इंच,अर्धा इंच अशी दर ८-१०दिवसांनी कमी-कमी करत जावे.म्हणजे त्या त्यावेळी शरीराची सवय बदलत जाते.   
शक्यतो कुशीवर झोपावे                               झोपताना नाकात २-२ थेंब देशी गाईचे तूप घालावेत.याला नस्य असे म्हणतात.यावेळी मान जास्तीत जास्त मागे करून नाक काटकोनात यावे.म्हणजे टाकलेले तुपाचे थेंब नाकामागील पोकळीमध्ये जातात.त्याचवेळी ४-५ मिनीटे तरी त्यांच स्थितीत रहावे.मग स्थितीबदल करावा.                 वजन वाढले की येणाऱ्या अनेक समस्यांमध्ये ही एक समस्या आहे.म्हणून शक्यतो वजन वाढू देऊ नये.        झोपण्यापूर्वी अनेकांना विडी,सिगारेट,दारु पिण्याची सवय असते.पण याने उष्णता वाढत असल्याने घोरणे थांबविण्यासाठी या व्यसनांपासून दूर रहावे.