NC Times

NC Times

वनवास संपला! पंकजा मुंडे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात, पण प्रीतम मुंडेंचा पत्ता कट


नवचैतन्य टाईम्स बीड प्रतिनिधी(एस.डी.कदम)  एवढे दिवस वनवास भोगला आहे. बापरे, म्हटलं वनवास पाचच वर्षांचा असावा या युगात बाबा. जुन्या काळात 14 वर्षांचा वनवास होता, आम्हाला पाच वर्षांचा वनवास पुरे झाला की तुम्हाला अजून पाहिजे? तुम्ही सगळे आहात ना माझ्याबरोबर ?"
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केल्यानंतर दोनच दिवसांत त्यांचा वनवास संपल्याचं भाजपच्या दुसऱ्या यादीतून दिसून आलं.
पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. याआधी बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार असलेल्या प्रितम मुंडेंना डावलून पंकजा यांना ही उमेदवारी देण्यात आली असल्यामुळे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
पंकजा मुंडे यांनी याबाबत बोलताना म्हटलं, “मला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. याचा मला आनंद आहे. माझं आणि प्रितमचं कॉम्बिनेशन चांगलं होतं. पण प्रितम यांचं तिकीट कापून मला दिलं त्यामुळे मनात संमिश्र भावना आहेत. आता मी लोकसभेची तयारी करणार आहे.”
2019 च्या विधानसभा निवडणूकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या विधानपरिषद, राज्यसभेच्या निवडणूकांमध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होत होती. पण पक्षाकडून पंकजा यांना संधी दिली गेली नाही.
2020 नंतर राष्ट्रीय कार्यकारणीत राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर पंकजा यांना मध्यप्रदेश प्रभारी पदाची जबाबदारीही देण्यात आली होती.