NC Times

NC Times

आरोग्यावर बोलू काही...


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे) "जवस"- तुमच्या रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करू शकते....            सध्याच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांच्या खाण्याच्या सवयी बिघडत आहेत आणि यामुळे लोक सतत नवीन आजारांना बळी पडत आहेत. सतत खाण्यापिण्याशी संबंधित चुका करत राहिल्याने उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) आणि हृदयविकाराचा धोका वाढतो तसेच शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही वाढते.                                                              त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. तथापि आपल्या आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देऊन शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे वाढते प्रमाण रोखले जाऊ शकते.तुम्ही ताबडतोब तुमची जीवनशैली बदलली पाहिजे. यासाठी आज आपण जवस तुमच्या रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कसे कमी करू शकते, हे जाणून घेणार आहोत. 

जवसाचा शरीरावर होतोय चांगला प्रभाव    पेरिफेरल आर्टरी डिसीज असलेल्या लोकांमध्ये ग्राउंड फ्लेक्ससीड्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या औषधासोबत एकत्रित केल्यावर शरीरातील कोलेस्ट्रॉलवर परिणाम न होता अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता त्यांच्यात असते. इतकंच नाही तर तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्यासाठी जवसाच्या बिया खूप चांगले आहेत. यात शंका नाही. जवसामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाचे अनेक आजार दूर होतात. या कारणास्तव फ्लॅक्ससीड हे पृथ्वीवर आढळणारे सर्वात पौष्टिक अन्न आहे असे म्हटले जाते. जवस 'असे' लढते कोलेस्ट्रॉलशी              प्राचीन काळापासून लोक आपल्या आहारात जवसाचा वापर करत आहेत. जवस सोबत त्याचे तेल देखील वापरले जाते. ग्रीक,रोमन,इजिप्शियन,चिनी आणि भारतीय संस्कृतीमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो फ्लेक्ससीड मध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फँटी ॲसिड विरघळणारे फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. हे सर्व पोषक खराब कोलेस्ट्रॉल काढुन टाकतात,ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.        कोलेस्ट्रॉलच्या आजारावर जवस हे जादूई  औषध...                                            फ्लेक्ससीड्स अल्फा -लिनोलेनिक ऍसिड (ए एल ए) मध्ये समृद्ध असतात. ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. यासोबतच ते इकोसापेंटायनोइ ॲसिड (ईपीए)आणि डोकोसाहेक्साएनोइक ॲसिड(डीएचए) मध्ये समृद्ध आहे. हे तिन्ही ॲसिड खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ओळखले जातात. म्हणूनच कोलेस्ट्रॉलच्या आजारावर जवस हे जादूही औषध आहे.                                        जवस रोज किती खावे                                आरोग्य तज्ञांच्या मते, रोजच्या आहारात एक चमचा जवसाचा वापर केला पाहिजे पण फॅक्ससीड कधीही कच्चे खाऊ नका,नेहमी आधी भाजून घ्या आणि नंतर खा. त्यांचे फायदे मिळण्यासाठी, ते योग्य स्वरूपात खाणे आवश्यक आहे. तुम्ही ते आणखी अनेक ड्रायफ्रूट्स आणि संपूर्ण बियांसोबत भाजून खाऊ शकता.                                    जवसाच्या बिया भाजून, बारीक करून, स्फूदी, हलवा लापशी, लाडू आणि दह्यामध्ये मिसळूनही खाता येतात सर्वसाधारणपणे,प्रत्येकाने जवसाच्या तेलाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जाऊ शकत नाही कारण त्यात आवश्यकतेपेक्षा जास्त ऍसिड असतात,जे चुकीच्या प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यावर देखील वाईट परिणाम होऊ शकतो. कोणत्याही  आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच जवसाचे सेवन करावे. तुम्ही जर कोणतेही औषध किंवा सप्लिमेंट घेत असाल तर फ्लॅक्ससीड घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.