NC Times

NC Times

तुमच्याही स्वप्नामध्ये साप येतो का? काय असतो या मागचा संकेत? काय असू शकतो या स्वप्नांचा अर्थ? वाचा माहिती


नवचैतन्य टाईम्स कराड प्रतिनिधी(संतोष पाटील)   

स्वप्न आणि स्वप्नांची दुनिया हा एक वेगळाच अनुभव असतो. जवळजवळ आपल्यापैकी प्रत्येकालाच वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडत असतात. यामध्ये काही स्वप्न खूप मानसिक आनंद किंवा मनाला आनंददायी देणारे ठरतात तर काही खूप घाबरवणारे किंवा मनाला दुःख होईल असे असतात.


परंतु स्वप्नाचे जग हे त्या त्या कालावधीपर्यंत म्हणजेच आपण झोपेत असतानाच्या कालावधीत थोड्या किंवा काही मिनिटांपर्यंत असते. नंतर जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा आपल्याला वास्तविकतेची  कल्पना येते. तसेच अनेक वेळा वेगवेगळ्या  प्रकारचे प्राणी किंवा इतर गोष्टी देखील स्वप्नामध्ये येत असतात.

प्रामुख्याने स्वप्नांचा विचार केला तर ती दोन प्रकारचे असतात असे आपल्याला म्हणता येईल. एक आपण जेव्हा झोपेत पाहतो ते आणि दुसरे म्हणजे आपण जागेपणी आपल्या आयुष्याच्या विषयी पाहतो ते. परंतु झोपल्यावर जी काही स्वप्न पडतात त्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा साप देखील दिसतात.


नेमका स्वप्नामध्ये साप दिसला तर त्याचा अर्थ किंवा त्या स्वप्नाचा अर्थ नेमका काय आहे हे आपल्याला माहित असणे देखील तेवढेच गरजेचे आहे. या अनुषंगाने आपण या लेखांमध्ये सापांविषयी कोणते स्वप्न पडले तर त्याचा काय संकेत किंवा काय अर्थ होतो याविषयी माहिती घेऊ.



 स्वप्नात साप दिसत असतील तर त्याचा अर्थ

१)- नाग आणि नागिनीची जोडी दिसली तर– स्वप्नशास्त्रानुसार जर आपण विचार केला तर एखाद्या व्यक्तीला सर्पाची किंवा नाग नागिन ची जोडी स्वप्नामध्ये दिसली तर ते अशुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार हे स्वप्न तेव्हा पडते जेव्हा तुम्ही पूर्वजांची अवहेलना करतात किंवा हेटाळणी करतात. त्यामुळे अशा परिस्थितीत चुकून देखील पूर्वजांबद्दल काही चुकीचे विचार मनात आणू नयेत. स्वप्नशास्त्रानुसार विचार केला तर जेव्हा असे स्वप्न तुम्हाला पडेल तेव्हा किंवा त्या दिवसापासून पूर्वजांच्या नावाने दिवा लावावा.

2- स्वप्नात सापाने तुमच्यावर हल्ला चढवला– जर स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीने पाहिले की साप आणि त्या व्यक्तीवर हल्ला केला आहे तर ते देखील अशुभ आहे. अशा प्रकारच्या स्वप्नाचा जर आपण स्वप्न शास्त्रानुसार अर्थ पाहिला तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या संकटाचे हे एक लक्षण मानले जाते. तसेच स्वप्नामध्ये तुम्ही मुंगूस आणि सापाची लढाई पाहिली तर ते देखील अशुभ असून या प्रकारचे स्वप्न तुमच्या आयुष्यातील कायदेशीर अडचणीचे लक्षण आहे असे देखील त्याचा अर्थ असतो.


3)- स्वप्नामध्ये जर तुम्हाला लांब साप त्याच्या बिळातून बाहेर येताना दिसला तर– जर स्वप्नामध्ये एखादा लांब साप त्याच्या बिळातून पडताना दिसला तर ते देखील स्वप्नशास्त्रानुसार अशुभ संकेत आहे असे म्हटले जाते. स्वप्नामध्ये लांब साप दिसण्याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या काळात तुम्हाला मोठा कसला तरी त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. यामध्ये जर तुम्हाला बिळातून साप बाहेर निघतांना दिसला तर अशा लोकांना नोकरी किंवा व्यवसायात तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सावध राहणे खूप गरजेचे आहे.

4- स्वप्नात साप तुमच्यावर पडताना दिसला तर– एखाद्याला स्वप्नामध्ये साप अंगावर पडताना दिसला तर हे देखील स्वप्नशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. अशा प्रकारचे स्वप्न म्हणजे हे येणाऱ्या दिवसात काहीतरी गंभीर आजार होण्याचे लक्षण समजले जाते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये किंवा असे स्वप्न पडायला लागले की भोले नाथाचे स्मरण करावे आणि इच्छा श्रद्धा नुसार व नमः शिवाय या मंत्राचा  11 ते 21 वेळा जप करावा. यामुळे अशा स्वप्नांचा वाईट परिणाम कमी होण्यास मदत होते असे देखील म्हटले जाते.