NC Times

NC Times

आरोग्यावर बोलू काही


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)                                                             
पेनकिलर आणि हार्ट अटँक.....  आजकालच्या तरुणामध्ये सहनशक्ती अजिबात राहिलेली नाही.कारण जरा काही दुखायला लागल की ही मंडळी लगेच पेनकिलरला पसंती देतात.त्यांना डॉक्टरा  कडे  जायचाही कंटाळा येतो.दुखण्यावर कुठलही मलम लावण्यापेक्षा ते पेनकिलर लाच अधिक पसंती देतात.या पेनकिलरमुळे आपल्याला तात्काळ बर वाटत त्यामुळे या गोळ्याची सवय होते.                          सवय याचा अर्थ असा की या गोळ्या आपण वारंवार घेतो.अशा रीतीने या पेनकिलरची हळूहळू सवय होते आणि आपण प्रत्येक वेळी या गोळ्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक असतात.केवळ हृदयाच आरोग्यच नव्हे तर ब्रेन स्ट्रोक चादेखील धोका यामुळे संभवतो.कारण या गोळ्यामध्ये आयब्रूफेन आणि डाइक्लो फेनैक सारखी केमिकल्स असतात.ही केमिकल्स हृदयाची गती अनियमित करतात. यामुळे अॉट्रीयल फिब्रिलेशनचा धोका वाढतो.                                         या स्थितीत हृदयाचे ठोके इतके वाढतात की हार्ट एटँकचा धोका अधिक आसतो.या पेनकिलर शरीरात साइक्लो अॉक्सिजन नामक इंझाइमला बाधित करत.त्यामुळे रक्तदाब वाढतो जेणेकरुन ठोक्यांची अनिय मितता वाढते.म्हणूनच सातत्याने पेनकिलर घेतल्यामुळे हार्टअटँक येण्याचा धोका तीन टक्यांनी वाढतो.म्हणून शक्य असेल तितक या गोळ्यापासून लाबंच राहा.तुमच्या दुखण्यापासून तुम्हाला लांब राहायच असेल तर तुम्ही योगधारणा,ध्यान,योग्य आहार आणि नियमित दिनचर्येचा अवलंब केला पाहिजे                                       आयुष्यभर माफक प्रमाणात व्यायाम करणे हितकारक असते.प्रमाणापेक्षा अधिक व्यायाम केला तर हृदयाच्या ठोक्याच्या लयीमध्ये अडथळा निर्माण होऊन अट्रीअल फायब्रिलेश(विकंपन) होऊ शकते.त्यामुळे ट्रोकचा धोका वाढतो आणि अशक्तपणा येऊ शकतो किंवा धाप लागू शकतो.या कारणांमुळे व्यायाम मर्यादित करायला हवा आणि अति व्यायाम केल्यास हृदयाला लाभ होण्याऐवजी हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल याची जाणीव होणे आवश्यक आहे.      

                                                                            इष्टतम व्यायाम पातळी......  दररोज साधारण ४५-५० मिनीटे व्यायाम करावा.यात ३०% अंगमेहनतीच्या व्यायाम असावा.या व्यायामामुळे तुम्हाला घाम येणे अपेक्षित आहे.४५० मिनिटे व्यायाम करतात त्यांना दिर्घकालीन आयुष्याचा संदर्भ  लक्षात घेता व्यायाम न करणाऱ्यांच्या तुलनेत ३९% लाभ होतो परंतु ज्या व्यक्ती दिवसाला तीन तास व्यायाम करतात त्यांना हा लाभ केवळ ३०% होतो म्हणजेच आठव ड्याला १५० मिनिटे व्यायाम करणाऱ्यां इतकाच तो असतो.ज्यांना हृदयविकार अनुवंशिक असलेल्या व्यक्ती लांब अंतर धावल्या तर त्यांना अहिदमियास, डायास्टॉलिक डिसफंक्शन इत्यादी हृदयविकार जडू शकतात.हे एन्ड्युरन्स एँथलिट्समध्ये आढळणारे विकार आहेत.                                                                 अति व्यायामाचे  परिणाम......  बहुतेक पेशींमध्ये मायटोकॉन्ड्रिअन आढळते आणि पेशींच्या चयापचयास मदत करणारे रसायन त्यांत असते.व्यायामा दरम्यान मायटोखकॉन्ड्रिया अधिक कष्ट करतात आणि त्यामुळे आरोग्य सदृढ राहते आणि दीर्घायुष्य लाभते.औषधाप्रमाणेच व्यायामाचा सुध्दा सुयोग्य डोस घेणे आवश्यक असते.अति व्यायामामुळे विकार जडण्याची आणि लवकर मृत्यू येण्याची शक्यताही अधिक असते.जेव्हा तुम्ही अति परिश्रम करता तेव्हा हृदय वहन यंत्रणेवर ताण पडतो.                                   त्यामुळे असाधारण लय निर्माण  होते आणि दीर्घ काळाच्या विचार करता हृदय बंद पडू शकते.प्रत्येक व्यायामाच्या शेड्यूल्डनंतर स्नायूंचे मायक्रोस्कोपिक नुकसान होत असते आणि तुम्ही किती तीव्र स्वरुपाचा व्यायाम केला आहे त्यावर त्याला ते नुकसान भरुन काढण्यास सुमारे २४ ते ४८ तासांचा अवधी लागतो.अलीकडेच अॉस्ट्रे लियातील क्रीडा नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार अति व्यायामामुळे गट लायनिंक कमकुवत होते आणि घातक विषारी घटक आणि जीवाणूं ना  रक्तप्रवाहात येणे शक्य होते.तुम्ही बऱ्याच काळापासून अति व्यायाम करत असाल तर तुमच्या शरीरातील संप्रेरकांवर  ही परिणाम होतो.                                    कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.त्यामुळे तुमच्या शरीरावर  प्रतिकूल परिणाम होतात.त्याचप्रमाणे दोन व्यायामाच्या शेड्यूल दरम्यान किमान आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.त्यामुळे तुमचे शरीर आपोआप झीज भरुन काढते.त्याचप्रमाणे आहार व्यवस्थित असावा.आहारामध्ये मासे,त्वचारहीत चिकन, फळे, पालेभाज्या, शेंगा,तृणधान्ये इत्यादींचा समावेश असावा  पोषक गरजा पूर्ण केल्या गेल्या नाहीत तर शरीराची झीज व्यवस्थित भरुन काढली जात नाही.प्रतिकारक यंत्रणा कमकुवत होते आणि त्यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडता.तुमच्या शरीरावर ताण पडत असेल तर तुम्ही चिडचिडे होता,नैराश्य येते,राग येतो,त्याचा तुमच्या मनावरही परीणाम होतो.कोलेस्टेरॉलची पातळी खूप जास्त काळ वाढलेली असेल तर शरीर चरबी कमी साठवून ठेवायला लागते.त्यामुळे चरबी कमी करण्याच्या उद्दीष्टाने व्यायाम सुरु केला असला तर अतिव्यायामाने उलटा परिणाम होतो.