NC Times

NC Times

खरसुंडी येथे पीएमश्री योजनेअंतर्गत जि.प शाळा नं१ व२ चे इमारतीचे भुमीपुजन सोहळा संपन्न


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)
खरसुंडी मध्ये आज पीएमश्री योजने अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ आणि शाळा नंबर २ इमारत बांधकाम साठी मंजूर रक्कम रुपये १ कोटी ६५ लाख रुपयांच्या कामाचा भूमिपूजन समारंभ खरसुंडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक मध्ये संपन्न झाला. यावेळी उपस्थित शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)आटपाडी तालुकाप्रमुख शेखर (भाऊ) निचळ यांच्या शुभहस्ते  संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होते.यावेळी मा.मुक्तेश्वर माडगुळकर        प.स.आटपाडी,मा.मोहनराव गायकवाड     शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प.सांगली      सौ.सुश्मिता पुजारी शाळा व्यवस्थापन     समिती शाळा नं २, मा.प्रकाश कांबळे  मुख्याध्यापक शाळा नं.२,  राष्ट्रवादी सांगली जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष जालिंदर (शेठ) कटरे, काँग्रेसचे युवा नेते सचिन (अध्यक्ष) गुरव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ.रणजीत भांगे, आग्नेन (काका) पुजारी, युवा नेते रुपेश गुरव, ऋषिकेश भिसे, अभिजीत केंगार, पांडुरंग केंगार निलेश जावीर, बिरुदेव कटरे, सिकंदर शेख, केंद्रप्रमुख विश्वास पुजारी सर, शाळा नंबर एक चे मुख्याध्यापक मा.शिवाजी ऐवळे सर, शाळा नंबर दोन मुख्याध्यापक कांबळे सर, धनाजी केंगार सर आणि सर्व शिक्षक स्टाफ आणि खरसुंडी गावातील पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित  होते.