NC Times

NC Times

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्रीच गौतमी देशपांडेची पोस्ट


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन)-अभिनेता रणदीप हुड्डा यानं दिग्दर्शिक केलेला स्वातंत्र्यवीर सावकर हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी रणदीप हुड्डा तसंच सिनेमाच्या टीमचं कौतुक केलं आहे. आता आणखी एका मराठी अभिनेत्रीनं या सिनेमासंदर्भात शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
 मराठी सिनेइंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री गौतमी देशपांडे हिनं या सिनेमाचं तिकीट मिळत नाहीये, सिनेमा हाऊसफुल्ल होतोय हे पाहिल्यावर आनंद होतोय... अशी प्रतिक्रियाही तिनं दिली आहे. गौतमीनं इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत सिनेमाचं कौतुक केलं आहे.
काय म्हटलं आहे गौतमीनं ?
प्लीज हा सिनेमा नक्की पाहा. माझ्या अंगावर काटा आला जेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवत 'वीर सावरकर की जय' अशा घोषणा देत होते. मी या सिनेमाची गेल्या कित्येक महिन्यांपासून वाट पाहत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर या देशाला अजून १०० वर्षे हवे होते, असं म्हणत गौतमीनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच रणदीप हुड्डाला टॅग करत, हा सिनेमा बनवल्याबद्दल तिनं त्याचे आभार देखील मानले आहेत.
 पुढं गौतमी म्हणते की, मला आनंद झाला की, या सिनेमाची तिकिटे मला मिळत नव्हती. हा सिनेमा हाऊसफुल्ल होतोय, ही एक कमाल भावना आहे. गौतमीच्या या पोस्टची सध्या चर्चा सुरू आहे.
शरद पोंक्षे म्हणाले की...
तसंच सावरकर प्रेमी म्हणून लोकप्रिय असलेले अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील सिनेमा पाहून प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'आज 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट पाहिला. ८३ वर्षांचं आयुष्य तीन तासांत दाखवायचं अत्यंत अवघड,पण हुड्डा यांनी ते छान दाखवलंय. विशेषतः अंदमान पर्व त्यात केलेले दयेचे अर्ज या सर्व गोष्टी पाहणाऱ्याला नीट लक्षात येतील व गैरसमज दूर व्हायला नक्कीच मदत होईल. हुड्डा ह्यांचं अभिनंदन.
 

तर दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे यांनीही पोस्ट शेअर केलेली चांगलीच चर्चेत आली आहे. अफाट अचाट आयुष्य जगलेल्या जातीपातीला गाडण्यासाठी झटलेल्या महान व्यक्तीमत्वाची प्रेरणादायी गोष्टं , ताबडतोब बघावा असा तडाखेबंद सिनेमा ...असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.