NC Times

NC Times

बाईक चालवताना फोनवर बोलण्यासाठी तरुणीचा जुगाड, ओढणीचा वापर पाहून पोलीस देखील लावतील डोक्याला हात


नवचैतन्य टाईम्स (प्रतिनिधी )-गाडी चालवत असताना मोबाईल फोनचा वापर करू नका असा सल्ला वारंवार दिला जातो. कारण फोनवर बोलण्याच्या नादात गाडीचं संतुलन बिघडून अपघात होण्याची शक्यता वाढते. बरं, यापूर्वी असे अपघात अनेकदा घडले देखील आहेत. आणि या अपघातांचे ढिगभर व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता. मात्र समस्येवर तोडगा काढण्यासाठी एका महिलेनं भन्नाट जुगाड शोधून काढला आहे. तिनं मोबाईल अशा पद्धतीनं आपल्या कानांवर अडकवलाय की जे पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल. हा देसी जुगाड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
 तरुणीनं कसा केला जुगाड?
भारतीय लोक जुगाड करण्याच्या बाबतीत कोणालाच ऐकत नाहीत. अशा अशा ट्रीक शोधून काढतात की ज्या पाहून खरंच थक्क व्हायला होतं. या महिलेनं देखील चालत्या स्कूटीवरून फोनवर बोलण्यासाठी असाच एक अतरंगी जुगाड शोधून काढला आहे. तिनं आपल्या ओढणीच्या मदतीनं फोन आपल्या कानांवर बांधला. स्कूटी चालवत ती फोनवर गप्पा मारत आहे. बरं, फोन बांधण्याची ही अनोखी पद्धत तुम्ही व्हायरल होत                                              नेटकरी करतायेत कारवाईची मागणी
ही घटना बंगळुरूमधील विद्यारण्यपुरा या ठिकाणी घडली आहे. हा व्हिडीओ २२ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकानी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी या महिलेचं कौतुक करतेय कारण अखेर बाईक चालवताना फोनवर बोलण्याची टेकनिक तिनं शोधून काढली. तर कोणी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी करतेय. कारण ती वाहतुक नियमांचं उल्लघन करताना दिसतेय. दरम्यान काहींनी हा व्हिडीओ बंगळुरू पोलिसांना देखील टॅग केलाय. असो, जुगाड कितीही भारी असला तरी हा प्रकार मात्र खरंच खतरनाक आहे. फोनवर बोलण्याच्या तंद्रित अपघात देखील होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडीओ तुम्ही केवळ मनोरंजन म्हणून पाहा आणि विसरून जा. असे प्रताप तुम्ही करू नका अन्यथा ट्रॅफिक पोलीस तुमच्यावर कारवाई करतील.