NC Times

NC Times

लढा विचारांचा एक विचार माझ्या माय माऊली साठी,एक विचार माझ्या सखीसाठी


नवचैतन्य टाईम्स वाई (प्रा.सरस्वती वाशिवले) 
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देणे आणि आरोग्य हाच आपला 'दागिना' यासाठी ही मार्गदर्शन करणे असाच उद्देश्य महिला दिनानिमित्ताने मनात रूजविणे, या साठी कार्यक्रम घेणे, 
 प्रत्येक घरातील महिलेसाठी
' ती' च्या आरोग्य साठी
 नारी तू सब में भारी है,
बेटी आज सबकी राजदुलारी है।
तू है हर एक घर में, 
तू ही है किसी के मन में, तू ही है कण - कण में, 
भगवती तू ही है,विश्वविधाती तू ही है।
हर घर की शान तू ही है,
हर दिल की धडकन तू ही है,
तूज में ही जन्नत है,
सभी के लिए मन्नत माँगनेवाली तू ही है। 
कौटुंबिक जबाबदारी यामुळे बऱ्याच स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. याशिवाय चुकीचा आहार, मानसिक ताणतणाव, बैठी जीवनशैली यामुळे महिलांमध्ये आरोग्याच्या विविध समस्या होत असल्याचे दिसून येते। स्त्रियांमध्ये मासिक पाळी, गर्भावस्था, मेनोपॉज, (रोजोनिवृती) अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर काही आरोग्याच्या तक्रारी होत असतात. ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कर्करोग यासारख्या कॅन्सरचे प्रमाणही स्त्रियांमध्ये अधिक आहे. पुरुषांच्यामानाने स्त्रीयांमध्ये पित्ताशयातील खडे, अर्धशिशी (Migraine), संधिवात, अनीमिया, मुत्राशयाचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे.
कोणत्या रोगांविषयी स्त्रीयांनी विशेष दक्ष रहावे ?
तसे पाहता आजार होऊ नये म्हणूनच आरोग्यकडे लक्ष दिले पाहिजे, परंतु स्तनाचा कैन्सर, सर्वायकल कँसर, हृद्यविकार, डिम्बग्रंथीचा कैन्सर, मलाशयाचा कैन्सर, मधुमेह, उच्चरक्तदाब, अस्थिपोकळ होणे (Osteoporosis) हे रोग अत्यंत कमी लक्षणे जाणवतात आणि हे रोग कधी गंभीर होऊन मृत्युस कारण ठरतात हे कळत नाही. शरीरात छुप्या स्वरुपात राहत असल्यामुळे या रोगांना ‘Silent killer diseases' असे म्हणतात. या छुप्या स्वरुपातील रोगांपासून रक्षण करण्यासाठी दक्ष असावे लागते. वरील रोग नसल्याची खात्री वैद्यकिय तपासणींच्याद्वारे वेळोवेळी करुन घेणे गरजेचे असते.
स्त्रीयांना आजार होण्याची प्रमुख कारणे :
👉🏽 पोषणतत्वरहित आहाराचे सेवन करणे.
👉🏽 हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध ताजी फळे यांचे अपुऱ्या सेवनाने.
👉🏽 अधिक तेलकट पदार्थ, चरबीयुक्त पदार्थांच्या सेवन केल्याने.
 👉🏽 चहा, कॉफी यांच्या अतिरेकामुळे विकारांची उत्पत्ती होते.
👉🏽 शारीरिक श्रमाचा अभाव, बैठी जीवनपद्धत्तीमुळे व मानसिक ताणतणावामुळे.
👉🏽 सौंदर्यासंबंधीच्या चुकिच्या संकल्पनेमुळे.
👉🏽 उशिरा होणारी लग्ने, आज मुलींत तिशीच्या आसपास लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. म्हणजेच वयात आल्यापासून लग्न होईपर्यंतचा टप्पा चांगलाच लांबला आहे. या कालावधीत महिलांना आरोग्याशी संबंधित विविध बाबींना तोंड द्यावे लागते. वैद्यकीय कारणांनुसार 20 ते 30 वर्ष हे वय प्रसूतीसाठी योग्य असते. 
👉🏽 आरोग्याच्या पायाभूत महितीअभावी डॉक्टरांच्या सुचनेशीवाय घेतलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांच्या अतिवापरामुळे स्त्रीयांमध्ये प्रामुख्याने विविध विकारांची उत्पत्ती होते.
या विकारांना थांबवण्यासाठी काहीसी आपल्या संस्कृतीतील दागिन्यांची भर 
पण सर्वोत्तम आरोग्य हाच दागिना हा दागिना टिकवण्यासाठी दागिन्यांचे महत्व
   -------------------------------
दागिने आणि आरोग्य
---------------------------------
◆ आयुर्वेदाच्या दृष्टीतून दागिने ◆
सौंदर्यवृद्धी करण्याबरोबरच दागिने आपल्या शरीरस्वास्थ्याचीही काळजी घेतात आणि काही रोग बरे करण्यास मदत करतात, असे आयुर्वेद सांगतो. ज्या धातूचे दागिने असतात त्यांचा प्रभाव शरीरावर होतो. ते आपल्या शरीरातील काही नलिकाबिंदूंवर दबाव टाकतात आणि त्यामुळे शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते आणि मन व शरीर प्रसन्न राहते. 

आयुर्वेदाच्या अनुसार सोन्याच्या दागिन्यांना कमरेच्या वरील भागातील अंगावर तर चांदीच्या दागिन्यांना संपूर्ण शरीरभर परिधान केले पाहिजे, असे मानले जाते.
◆ अंगठी ◆
हाताच्या प्रत्येक बोटात अंगठी घालण्याची पद्धत आहे. अंगठी बोटात घातल्यास ती अनेक प्रकारच्या रोगांवर प्रभावी ठरते. मसलन आणि कनिष्टिका म्हणजे शेवटचे लहान बोट (करंगळी) आणि तिच्या जवळचे बोट यांच्यात अंगठी घातली की घबराट, हृदयरोग, हृदयशूल आणि मानसिक तणाव यांपासून होणारा त्रास कमी होतो. कफासंबंधीच्या तक्रारी, प्लिहा, लिव्हर याबाबतीतल्या ज्या तक्रारी असतात, त्या सोन्याची अंगठी घातली असता कमी होतात, तर पित्त-वाताच्या विकारांवर व पचनासंबंधीच्या तक्रारींबाबत चांदीची अंगठी घालणे फायदेशीर ठरते. कफ, दमा किंवा शरीराला कंप येणे याबाबतीत तांब्याची अंगठी बोटात घालणे उपयुक्त ठरते, असे आयुर्वेद सांगते.
◆ रत्नहार, मोत्यांचा कंठा, नेकलेस ◆
हे परिधान केल्याने गळ्याच्या विशिष्ट भागांवर दाब पडतो आणि त्यामुळे डोळ्यांतील तेज पुष्कळ वेळ टिकून राहते. गलगंड व मानेखालची हाडे यांच्यावर होणाऱ्या अनिष्ट परिणामांचा प्रभाव कमी होतो. गळ्याच्या सर्व संभाव्य रोगांवर ही आभूषणे घालणे फायदेशीर मानले जाते.
◆ कमरपट्टा ◆
कमरेला कमरपट्टा घालणाऱ्या महिलांची पचनशक्ती वाढते व मासिक पाळी योग्यप्रकारे होते. त्यांना कंबर दुखणे, पाठदुखी वगैरे तक्रारींना तोंड द्यावे लागत नाही, असे मानले जाते. 
◆पायातील व बोटातील कडय़ा◆
या घातल्यामुळे टाचा दुखणे, घोटे व पाठीच्या खालच्या भागात वेदना होत नाहीत. रक्तप्रवाह उत्तम प्रकारे चालू राहतो. तसेच महिलांना हिस्टेरिया, श्वास यांचा त्रास जाणवत नाही, असे मानले जाते.
◆ बाजूबंद ◆
हा अलंकार खांदा आणि हाताचा कोपरा यादरम्यान घालतात. हा फक्त हृदयाचीच कार्यक्षमता वाढवत नाही तर खांदा व हात यांना जो वेदनांचा त्रास होतो, त्यापासून सुटका करतो. बाजूबंद घालणारी स्त्री संयमी बनते, असे मानतात.
◆ नथ ◆
नथ घालण्याची प्रथा आजकाल कमी होत चालली आहे. पण नथ घालण्याने कफाच्या व नाकाच्या रोगांपासून बचाव होतो, असे मानले जाते.
◆ कर्णफुले किंवा भिकबाळी ◆
कानात एकूण शरीराशी संबंधित असे जवळपास ८० केंद्रबिंदू आहेत. कानात कर्णफुले किंवा भिकबाळी घातली तर हे सर्व बिंदू प्रभावित होतात आणि विविध रोगांवर नियंत्रण ठेवले जाते. यामुळे फेपरे येणे, टॉन्सिल, हार्निया या व्याधींपासून सुटका मिळते, असे मानले जाते.
◆ माथ्यावरील टिक्का ◆
कपाळावरील टिक्क्यामुळे संवेदनशक्ती स्नायूंच्या एकूण तंत्रावर नियंत्रण ठेवते, असे मानले जाते.
◆ बांगडय़ा ◆
स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगडय़ांचा चांगला उपयोग होतो. त्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते. दात दुखणे, रक्तदाब कमी-जास्त होणे यांवर या बांगडय़ांचा अनुकूल परिणाम होतो. बोबडेपणा, तोतरेपणा यांच्यावरही उपयोग होतो, असे मानले जाते.
◆ बिंदी ◆
बिंदी मेंदूला थंडावा देते. महिलांच्या भांगात भरला जाणारा सिंदूर हा लाल अ‍ॅक्साइडयुक्त असतो. दोन्ही भुवयांत लावलेली बिंदी आज्ञाचक्राला सक्रिय ठेवते. मानसिक शक्ती व स्मरणशक्ती वाढवण्यास पोषक ठरते, असे मानतात. 
◆ जोडवी ◆
पायांत जोडवी व तत्सम प्रकारच्या वस्तू घातल्या तर प्रसूतिवेदना कमी होतात आणि ताप येणे, चक्कर येणे या बाधा होत नाहीत, असे मानले जाते.
संस्कृती आणि ती चे म्हणजे तुझे आरोग्य दोन्ही अलंकारा इतकेच महत्वाचे आरोग्य चा दागिना जपणे आहे,
या साठी तूला च निर्णय घेणे आहे,
आईपण एक लेणे आहे,सृष्टि स काही देणे आहे,  
तूच तुझ्यासाठी काहीतरी मागणे आहे,
तुझ्या च हाती तुझे वागणे आहे,
माझे ही तुला एकच सांगणे आहे,
आज या दिनी,फसल तुझ्या मनी,
मी,स्वतःचा विचार करेन क्षणों-क्षणी
तिच्या साठी ' ती ' आणि तीच
  ह.भ.प.प्रा. सौ.सरस्वती ताई भोसले-वाशिवले. 🙏🏻