NC Times

NC Times

नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयास नॅक B मानांकन


नवचैतन्य टाईम्स  फलटण प्रतिनिधी(दिनेश लोंढे) 
नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयास नॅक B मानांकन मिळाल्याबद्दल फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री दिपकराव चव्हाण साहेब, श्री प्रविण गायकवाड सी एस आर प्रमुख कमिन्स इंडिया लिमिटेड, श्री सुभाष गायकवाड संचालक मालोजीराजे सहकारी बँक लि. फलटण, श्री रवी गायकवाड माऊली विचार मंच, श्री संदिप गायकवाड सदस्य शालेय व्यवस्थापन समिती तरडगाव यांनी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली व कौतुक करून अभिनंदन केले याप्रसंगी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिल्याबद्दल फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री दिपकराव चव्हाण साहेब तसेच सर्व मान्यवरांचा श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे मानद सचिव मा.श्री.डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) भैय्यासाहेब व श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सदस्य मा.श्री. महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.