NC Times

NC Times

तिसंगी येथील सकल मराठा समाजाच्यावतीने आमदार सुमनताई पाटील यांना निवेदन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)  :- सकल मराठा समाज तिसंगी (ता कवठेमहांकाळ) च्या वतीने येत्या १५ तारखेपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाची भक्कम बाजू मांडण्यासाठीचे व सगेसोयरे अधिसूचनेच्या बाजूने मत मांडण्यासाठीचे निवेदन आमदार सुमनताई पाटील यांना देण्यात आले.यावेळी बहुसंख्येने सकल मराठा बांधव उपस्थित होते.
      निवेदनात असे म्हणण्यात आले आहे की मराठा समाजाचा समावेश हा ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादित करण्याबाबतही बाजू मांडाण्यात यावी,त्याचबरोबर सदर अधिवेशनात सगेसोयरे अध्यादेश पारित करण्यात येणार आहे.यासाठी मतदान होणार आहे.त्यामध्ये आमदार सुमनताई पाटील यांनी मराठा समाजाच्या बाजून मतदान करावे असेही म्हणटले आहे.त्याचबरोबर जर तसे न केल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या वतीने स्वतंत्र उमेदवार उभा केला जाईल असेही शेवटी निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 
       यावेळी प्रदिप पाटील,सचिन कदम,दादासाहेब कुंभार,सागर शिंदे,शिवाजी शिंदे,नेताजी कदम, प्रशांत पाटील,प्रमोद पाटील,अर्जुन पाटील,संकेत पाटील,रुपेश पोळ,नंदू पाटील,राहुल कदम,अवि पाटील, अमोल पाटील,प्रकाश जाधव,नारायण भोसले,महेश पाटील प्रताप पोळ,अमर गायकवाडसह सकल मराठा समाजबांधव उपस्थित होते.