NC Times

NC Times

रायवाडी येथील श्री यल्लम्मा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):-  ' उदं ग आई उदं '  च्या गजरात भंडारा खोबर्याच्या उधळणीत व भव्य अशा सुवाद्यासह निघालेल्या पालखी मिरवणुकीने रायवाडी (ता कवठेमहांकाळ) येथील श्री यल्लम्मा देवीची यात्रा ही मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यात्रेदरम्यानं मंदिर परिसरात भाविक भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. 
     
बुधवार दि ७  रोजी देवीची बोनी व नैवेद्य पार पडला.तर सदर दिवशी सायंकाळी ६ ते रात्री १० यावेळेत मास्टर तानाजी भोसले वाघेरीकर-कराड यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम पार पडला.तर गुरुवार दिनांक ८ हा यात्रेचा मुख्य दिवस होता.यावेळी मंदिर परिसरात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम पार पडले.सदर दिवशी अगदी सकाळ पासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती.याच दिवशी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत वाघेरीकर-कराड यांचा पुन्हा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला.तर सकाळी दहा वाजताच सुवाद्यसह गावातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूकीलाही सुरवात करण्यात आली.यावेळी भाविक भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी दुतर्फा मोठी गर्दी केली होती.सदर पालखी घरोघरी फिरुन दुपारी चार नंतर कीचाच्या ठिकाणावर नेहण्यात आली.तेथे किचाचा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता झाली. 
          तर यात्रेनिमित्तच शुक्रवार दिनांक ९ रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत ललकार मुझिकल नाईट-कोल्हापूर हा बहारदार असा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम पार पडला.यात्रेनिमीताने पाळणेवाले,खेळणीवाले,मिठाईवाले त्याचबरोबर छोट्या-मोठ्या व्यापारी वर्गांची मोठी रेलचेल दिसून येत होती.यात्रा कमिटी व पोलीस प्रशासनाच्या वतीने यात्रेत चोख अशी व्यवस्था व बंदोबस्त ठेवण्यात आला होता.