NC Times

NC Times

शरद पवारांच्या हस्ते रायगड किल्ल्यावर तुतारी चिन्हाचे अनावरण सोहळा संपन्न


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हे चिन्ह वापरता येणार आहे. त्याआधी या चिन्हाच्या अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार गटाकडून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. ऐतिहासिक असलेल्या या चिन्हाचं अनावरण किल्ले रायगडावर करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमित जाऊन शरद पवारांच्या हस्ते या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे. दरम्यान, यानंतर शरद पवारांनी जनतेशी संवाद साधताना तुतारी जनतेला प्रेरणा देईल, असा विश्वास निर्माण केला.

“सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील”, असं शरद पवार म्हणाले.