NC Times

NC Times

"चित्रपट क्षेत्राचे आपल्या जीवनातील स्थान. आणि चित्रपटांचे अवाजवी आणि नकारात्मक अनुकरण नकोच"


नवचैतन्य टाईम्स वाई (अमोल मांढरे)दि.१० फेब्रुवारी
प्रथम आपल्या सर्वांच्या मनातील एका भावविश्वाला स्पर्श करणारा आणि आपल्या आठवणींना उजाळा देणाऱ्या बॉलीवूडवर आज मी एक वैचारिक लेख लिहीत आहे. अगदी स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून आपल्या जुन्या पिढीला ही, सर्व स्तरातील लोकांना आकर्षित करणारी हिंदी चित्रपट सृष्टी आपल्या सर्वांना अवघतच आहे. त्यात दिलीप कुमार, राज कपूर ,राजेश खन्ना ,राजकुमार अशा विविध प्रसिद्ध आणि नामवंत कलाकारांनी आपल्या सर्वांच्या मनात अधिराज्य केले. आणि आपल्या अतुलनीय अभिनयाने रसिकांच्या मनात एक विशिष्ट छाप पाडली. नव्वदच्या दशकानंतर याच हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलिवूड असे संबोधले जाणे सुरू झाले. आपल्या सर्वसामान्य लोकांच्या मनातील त्यांच्या जीवनातील लहान मोठ्या घटना, सवयी याचेच प्रतिबिंब आपल्या बॉलिवूड चित्रपटसृष्टीत विशिष्ट अभिनयाने आपण सर्व पाहत आलो आहोत. विशेषतः 90 च्या दशकातील चित्रपट सृष्टीने विविध कलाकारांनी विविध चित्रपट ,अल्बम, अशा विविध प्रकारे रसिकांच्या लोकांना मन जिंकून घेतले. त्यात महत्वाचे म्हणजे बॉलिवुड आपले जीवनाचे प्रतिबिंब की आपले जीवन हे बॉलीवुडचे प्रतिबिंब हा एक मनाला स्पर्श करणारा एक वेगळा विषयाच आहे. अगदी लहान थोरांपासून ,सर्वांनी आपल्या वैयक्तिक जीवनात त्याला डोळे झाकून स्थान दिले. याच बॉलिवुडच्या आकर्षणाने आपल्या मायानगरी मुंबईत दररोज शेकडो जण येत असतात व आपले स्वप्न बघत असतात. परंतु त्यातले कितीजण यशस्वी होतात. आणि नंतर त्यांचे काय होते हा एक प्रश्नच आहे. पण तसे सांगायचे म्हटले तर ,आपल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवावर सखोल परिणाम करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांनी आपले आयुष्य सुख समृद्ध केले आणि या चित्रपटांनी लोकांना अक्षरशः वेड लावले. तेव्हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचे स्थान असणाऱ्या  या बॉलीवूडचे वैचारिक मंथन करणे मी गरजेचे समजतो. तेव्हा आपण सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांनी विचार करायला हवा की आपण ज्यांच्यावर अगदी डोळे झाकून अंधविश्वास म्हटले जावे तर योग्य ठरेल,  बॉलिवूड कलाकार हे पडद्यावर व वैयक्तिक आयुष्यात कसे असतात याचाही आपण विचार करायलाच हवा. याच आपल्या रसिक माय बाप्पांच्या जीवावरच अनेकांनी आपली स्वतःची अफाट संपत्ती उभी केली. असो ते त्यांचे वैयक्तिक जीवनाचा आहे .परंतु याच समाजातील प्रश्नांवर काही भूमिका मांडायची अथवा आपले कर्तव्य समजून काही काही भूमिका मांडायची अथवा समाजातील गरजू लोकांना, त्यांच्या चाहत्यांना काही मदत करायची हा विचार किती कलाकारांच्या मनात सध्या आहे .हा एक महत्त्वाचा विषय आहे. सध्या कोरो ना काळाबरोबरच शेतकऱ्यांची आत्महत्या, शहीद जवानांची प्रश्न, बेरोजगारी, हे समाजातील महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यात बॉलीवूडमधल्या अगदी मोजकेच कलाकारांनी आपले कर्तव्य समजून विविध रूपांनी मदत नक्कीच केली आहे. परंतु या कलाकारांची टक्केवारी यात अगदी मोजकीच आहे. सध्या सोशल मीडियावर याच बॉलिवूडमधील कलाकारांच्या बेताल वक्तव्य आणि आपल्या सामाजिक क्षेत्रात सखोल परिणाम केला आहे. विशेषता युवक वर्गांनी याच बॉलिवूडच्या आकर्षणामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ बिघडून घेतले आहे. त्यात अगदी बौद्धिक दृष्ट्या प्रावीण्य मिळवणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांचाही सहभाग हा नक्कीच ,एक गंभीर विषय आहे. चित्रपटातील अंधानुकरण मुळे आपल्या समाजात अनेक गुन्हेगारी घटना घडत असतात व त्यात अगदी आपण दुसऱ्यांना दोषी धरून आपण मोकळे होतो. परंतु हे सर्व बॉलीवुड मधल्या चित्रपटांच्या अनु कारणामुळेच आहे .याकडे आपले कदाचित लक्ष गेलेच नसेल. तेव्हा आज आपण सर्व पत्रकार बांधवांनी या विषयाचे समाज प्रबोधन करून आपले कर्तव्य पार पाडावे. याच बॉलिवुडच्या कलाकारांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नसते. पडद्यावर अगदी आपली भुरळ पाडून आपली अफाट संपत्ती वाढवतच आहेत. सध्या बॉलिवूडमध्ये नवनवीन कलाकार आपले उत्कृष्ट अभिनय याद्वारे समाजातील प्रश्नांना तसेच सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक व विविध प्रश्नांवर उत्तम अभिनयाने समाजहिताचे काम नक्कीच करत आहेत. हा नक्कीच एक कौतुकाचा विषय आहे. परंतु हे काम किती कलाकार निष्ठेने करतात हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आपण सर्वसामान्य लोक ज्या माणसांना आपले आयडॉल समजतो त्या व्यक्तींचे अभिनय करूनच हे बॉलीवूड मधले कलाकार आपली खोटी छबी रसिकांच्या मनात निर्माण करत आहेत. आणि अगदी आपले सर्व लहान थोरांपासून रसिक प्रेक्षक आपल्या जीवनात या लोकांना अगदी विशिष्ट स्थान देत आहेत. उद्याच्या देशाचे आधारस्तंभ असलेली युवा पिढी ज्या वयात आपले करियर घडवतात ,त्याच वयात या बॉलिवुडच्या आकर्षणामुळे स्वतःची करियर बरबाद करून आपल्या जीवनाची वाटच लावत आहेत. तेव्हा आपल्या या भारतीय संस्कृतीकडे दुर्लक्ष करणारा युवक वर्गांनी फक्त एका ठराविक वेळेसाठी बॉलीवूडचे आकर्षण समजून, आपले सद्य परिस्थितीवर आधारित जीवनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असो  या नव्या पिढीकडे बौध्दिक क्षमता नक्कीच पूर्वीपेक्षा अधिक आहे. हे दुर्लक्ष करून चालणार नाही. तेव्हा केवळ मनोरंजन समजून बॉलीवूड कडे पहावे परंतु त्याचबरोबर आपण आपल्या देशाचे भविष्यातील आधारस्तंभ आहोत व आपल्या पालकांबरोबर समाजहित करण्याची आपली जबाबदारी ओळखणे हे युवकांना नक्कीच समजणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमधील व्यसनाधीनता, गुन्हेगारी प्रवृत्ती ,राजकीय व सामाजिक स्थिती बिघडणारी,या घटना यांवर आधारित चित्रपटांकडे आपण सर्वांनी अगदी दुर्लक्ष करून आपले सामाजिक व कौटुंबिक हित ही जोपासणे गरजेचे आहे.
आत्तापर्यंत याच बॉलीवुड चित्रपटांमध्ये आपल्या देशाच्या शौर्याच्या, सैनिकांच्या शहिदांच्या, जीवनावर आधारित अनेक चित्रपट झाले व त्यांनी रसिक प्रेक्षकांची मनेही जिंकली. परंतू आपणच रसिक प्रेक्षक याच कलाकारांना अगदी आपले दैवत समजतो. आणि या वीर सैनिकांच्या, आणि थोर महापुरुषांच्या जीवनावर आधारित आपण चित्रपट बघतो. त्यातील ते कलाकार निव्वळ आपल्या स्वार्थासाठी अभिनय करतात परंतु आपण मूर्ख रसिक प्रेक्षक त्यांना उच्च मानतो व खऱ्या सैनिक व महापुरुषांना आपण दुर्लक्षित करतो तेव्हा आजच्या जागतिकीकरणात आपण या विषयाकडे गांभीर्याने पाहूया. आता  बॉलिवूड अशोभनीय चित्रपटांवर बंदी आणणे ही काही शक्य गोष्टी नाही. कारण सध्याच्या वाढत्या सोशल मीडियामुळे आणि उच्च तांत्रिक इंटरनेटमुळे ते शक्य नाही. परंतु अनेक विषयात प्रभुत्व मिळणारे व जाणकार असलेली सध्याची युवा पिढी ने बॉलिवूडचा केवळ काही मर्यादेपर्यंतच आणि मनोरंजनाचा पुरताच वापर करून आपल्या खऱ्या महापुरुषांना, आपल्या बळीराजाला, आपल्या वीर जवानांना, आपल्या थोर माता-पित्यांना, आपल्या जीवनात योग्य स्थान देऊन आपली कर्तव्य पार पाडावे. यातील एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे याच बॉलीवूड चित्रपट सृष्टितून अनेकांना रोजगार मिळतो. हे वास्तव दुर्लक्ष करून चालणार नाही. अगदी अभिनयाबरोबरच, विविध तांत्रिक कलाकारांना यातून उत्तम  संधी मिळते. परंतु त्याच बरोबर आजचा युवक वर्गाने ही या संधीचा सारासार विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. आणि विशेष म्हणजे आजची युवा पिढी ही बौद्धिक क्षमतेचे बरोबरच चांगल्या वाईट गोष्टींना जाणण्यासाठी सक्षम आहेच. तेव्हा या बॉलिवूडमध्ये अनेक उत्तम संधी चालून येत असली तरी त्याचा आपल्या सामाजिक व राष्ट्रहित यावर नकारात्मक परिणाम होणार नाही, याची जाण युवकांनी ठेवावी व पुढील योग्य निर्णय घ्यावा.
आज बॉलीवुड मध्ये काही कलाकार ही कलेची मनापासून उपासना करून, उत्तम अभिनय करत आहेत .व रसिक प्रेक्षकही त्यांच्या या कलेस नक्कीच उत्तम दाद देत आहेत तेव्हा माझा संपूर्ण बॉलीवूड वर टीका करणे हा उद्देश नक्कीच नाही ,तर तो या कलाकारांवर अन्याय कारण हेच कलाकार आपल्या कलेद्वारे समाजात अनेक हिताची, व मनोरंजनाबरोबर, उत्तम संदेश देत आहेत. तेव्हा आपणच रसिक प्रेक्षकांनी योग्य व अयोग्य याची निवड करून गुणवंत कलाकारांच्या कलेस दादा देऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे.हे समाज हिताचेच काम ठरेल.आणि जाता जाता मला या लेखाच्या शेवटी एवढेच सांगायचे आहे की बॉलिवूडचे कलाकार यांनी, आपले मायबाप रसिक प्रेक्षकाला संकट समयी, काही आर्थिक मदत करावी ही अपेक्षा नाही परंतु याच मायबाप रसिक प्रेक्षक कामामुळे आत्ता आपल्याला मिळालेली सामाजिक प्रतिष्ठा आणि अफाट संपत्ती याचा सुयोग्य वापर थोडा का होईना परंतु समाजहितासाठी करावा हीच अपेक्षा.
आणि सर्वांना सामावून घेण्याची कला असलेल्या आपल्या सर्व भारतीय नागरिकांनी, बॉलिवूड आणि रसिक प्रेक्षक यांमधील अतूट नाते योग्यप्रकारे जपावे, हीच सदिच्छा.
धन्यवाद. कविराज अमोल मांढरे.वाई जिल्हा.सातारा.
Mobile no.7709246740.