NC Times

NC Times

पत्रकारितेतूनच बहुमूल्य स्वातंत्र्य. आजही युवकांनी प्रबोधनाचा वारसा जोपासावा"....


नवचैतन्य टाईम्स  वाई प्रतिनिधी(अमोल मांढरे) 
   नमस्कार मी पत्रकार अमोल मांढरे. वाई. जिल्हा सातारा.आपल्या पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत असताना, आलेल्या अनुभवांवर मी हा प्रबोधनात्मक लेख लिहीत आहे.आजच्या वाढत्या जागतिकीकरणात पत्रकारिता हे युवक वर्गासाठी एक योग्य व आव्हानात्मक क्षेत्र आहे. . स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या जुलमी राजवटीला विरोध करण्यासाठी व समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी पत्रकारिता या माध्यमातूनच नवी क्रांती केली. व तीही आज आपल्या समाजासमोर एक आदर्श आहे.
     आज वाढत्या आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर मोबाईल, इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अगदी एका सेकंदात आपण हजारो किलोमीटर दूरवरच्या व्यक्तीशी क्षणात संपर्क साधू शकतो. आज आपल्या देशात विविध समस्या निर्माण होत आहेत. सध्या टीव्ही चॅनल्सवर अनेक न्यूज चॅनल मध्ये स्पर्धा निर्माण होत आहे. साहाजिकच यामध्ये बऱ्याच प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. तेव्हा विशेषतः आजच्या युवकांसाठी पत्रकारिता हे योग्य व आव्हानात्मक क्षेत्र आहे. उत्तम आर्थिक वेतन ,समाजात प्रतिष्ठा व लोक सेवा करण्यासाठी संधी हे लक्षात घेऊन युवकांनी यामध्ये आपले भवितव्य घडवावे. आज न्यूज चॅनल बरोबरच विविध पोर्टल चैनल त्याचबरोबर सोशल मीडियामध्ये विविध बातम्या प्रसारित होत आहेत. याला आपल्या समाजातील विविध स्तरातील लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. त्याचबरोबर समाजातील विविध प्रश्नांचा, नागरिकांच्या प्रश्नांवर अभ्यास करून त्यासाठी पत्रकारिता क्षेत्र हे विद्यार्थ्यांनी निवडणे गरजेचे आहे. आपला बळीराजा, वीर जवान, आपल्या महापुरुषांचा आदर्श, परराष्ट्र धोरण विविध सामाजिक व शैक्षणिक समस्या त्याचबरोबर कला, क्रीडा, आरोग्य आणि मनोरंजन अशा विविध विषयात पत्रकारिता क्षेत्रात युवक आपले विचार समाजासमोर मांडू शकतात. विशेषतः विद्यार्थ्यांनी आता चाकोरी बाहेर जाऊन पत्रकारिता हे क्षेत्र निवडणे त्यांच्या व आपल्या समाजासाठी सकारात्मक आहे. अगदी ग्रामीण भागाच्या तळागाळात पासून ते थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पत्रकारिता क्षेत्रात युवकांना नवनवीन संधी निर्माण होत आहेत. तेव्हा युवकांनी गांभीर्याने विचार करून याला एक योग्य संधी समजून पत्रकारिता क्षेत्रात आपले उज्ज्वल भवितव्य घडवायचे आहे. . पत्रकारिता क्षेत्रात करिअर करण्यास उस्तुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज मोबाईल व संगणक त्याचबरोबर इंटरनेट या नवनवीन माध्यमातून मार्फतही पत्रकारिता क्षेत्रात करिअर करता येणे सहज शक्य आहे. युवकांनी फक्त यास करियर म्हणून न बघता आपल्या समाजासाठी एक आद्य कर्तव्य म्हणून या क्षेत्राकडे पाहणे हे अत्यंत गरजेचे आहे.आज आपले सर्व पत्रकार बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन आपले कर्तव्य बजावीत आहेत.तसेच एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे सध्याचे नवीन पत्रकार विद्यार्थी आहेत, आजच्या वाढत्या इंटरनेट युगात या क्षेत्रात काम असणाऱ्या विद्यार्थ्यांना भरपूर वाव तसेच विविध विषयातील अभ्यासक्रम करता येऊ शकतो. आज एका क्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कडे बातमी अथवा माहिती कळू शकते. परंतु एक गोष्ट म्हणजे जी आपने जुने ज्येष्ठ पत्रकार बांधव आहे ते त्यांच्या जीवनात अत्यंत कष्टाने व मेहनतीने पत्रकारिता क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख जोपासली आहे. तेव्हा आत्ताच यासारखी इंटरनेट व्यवस्था व जलद दळणवळण नव्हते. त्यामुळेच त्यांच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात एक विशिष्ट अशी धार होती. तेव्हाच्या पत्रकारितेतील प्रत्येक पत्रकारांची स्वतःची अशी एक विशिष्ट लेखन शैली, त्याच धारदार लेखन शैलीने त्यांनी आपले महाराष्ट्र राज्याला असलेल्या पत्रकारितेच्या समृद्ध परंपरेचा आदर्श कायम ठेवला.तेव्हा आपल्या पत्रकारांनी त्यांचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या विद्यार्थ्यांनी  आत्ताच संधीचा पुरेपूर फायदा करत पत्रकारितेच्या क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य घडवायचे आहे. सध्या पत्रकारी क्षेत्राचे वाढत्या जागतिकीकरणात  मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे. तसेच आजच्या युवकांसाठी विविध रोजगाराची संधी ही नक्कीच उपलब्ध राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी आजच्या युवकांनी गांभीर्य ओळखून त्याचा पुरेपूर फायदा करावा.. आपण महाराष्ट्रात मराठी पत्रकार बांधवांनी हीआपल्या मातृभाषेचे संवर्धनासाठी व भविष्यातील स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी आपले आद्य कर्तव्य समजून पत्रकारिता क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणे गरजेचे आहे. आणि आजच्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे शिक्षण ही एक वाघिणीचे दूधच आहे, त्याचा फायदा कधी ना कधी योग्य प्रकारे त्यांना मिळतोच. आणि एक गोष्ट लक्षात घेणे दोघी म्हणजे मी आपल्या पत्रकार बांधवांना सांगतो की,  पत्रकारिता क्षेत्र  एक  अथांग समुद्र आहे आणि आता तर कुठली आपली खरी सुरुवात झालेली आहे.आज पत्रकारिता क्षेत्र विविध आधुनिक सोयींमुळे व्यापक प्रमाणात पसरलेले आहे. पूर्वी काही मर्यादित वर्तमानपत्राची संख्या असताना, आज असंख्य  वर्तमानपत्र आपण पाहत परंतु आजचे युवा पत्रकारांची जबाबदारी आहे ती त्यांनी पत्रकार क्षेत्र व त्यांना असलेला आदर्श व पावित्र्य कायम ठेवून याचे बाजारीकरण कधी होऊ नये याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. शासनाने ही पत्रकारांसाठी मदतीचा हात देणे गरजेचे आहे. शासनाबरोबरच विविध सामाजिक संस्था, समाजातील जाणकार नागरिक यांनी पत्रकारांना च्या उत्कृष्ट कामासाठी आर्थिक व मानसिक पाठबळ देणे गरजेचे आहे. त्यामुळेच आपले  परिवारातील  सर्व पत्रकार बांधव हे त्यांचे कार्य भविष्यातही चालू ठेवतील. पत्रकारांना एक विशिष्ट माध्यम आणि सोनेरी संधीची गरज आहे.मी सांगू इच्छितो की आपले कॅलिफोर्निया टाइम्स वृत्तपत्र 
ने मला ती संधी दिलीच आहे. माझे असंख्य लेख संग्रह या वृत्तपत्रात प्रकाशित झालेली आहेत.आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आपण एकमेकांच्या सहकार्याने संघटितपणे आपले वृत्तपत्र हे महाराष्ट्रात एका नव्या उंचीवर नक्कीच पोचवू हीच आई भवानी चरणी प्रार्थना. धन्यवाद. जय महाराष्ट्र
कविराज अमोल मांढरे वाई.जिल्हा सातारा..
Mobile no.7709246740