NC Times

NC Times

वाई पसरणी येथील ज्ञानदीप इंग्लिश मेडियम स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज च्या वतीने मराठी भाषा गौरव दिन मोठया उत्साहात साजरा


नवचैतन्य टाईम्स वाई (प्रा.सरस्वती वाशिवले)  
ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाई पसरणी यांच्या वतीने आज प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आली असुन शाळेच्या वतीने  ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक मा.श्री.विष्णू वामन शिरवाडकर (कवी कुसुमाग्रज)यांची जंयती ही चैतन्यमय वातावरणात संपन्न झाली.या निमित्ताने सकाळच्या प्रथम  सत्रात सौ. वाशिवले मिस यांनी मराठी भाषा गौरव दिनाचा उद्देश विस्तारीत केला,
कु.गायित्री गलांडे या विद्यार्थ्यीनीने मराठी भाषा दिनानिमित्त ' गौरव मराठीचा' आणि कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्याची माहिती दिली
तसेच विद्यालयातील चैतन्य बागडे,अमोल बोडरे यांनी मोठ्या जल्लोषात सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.इयत्ता- दुसरी तील विद्यार्थ्यीनीं कु.सृष्टी गाढवे हिने'मला मराठी भाषा आवडते'या विषयावर मनोगत व्यक्त केले.
इयत्ता-५वीतील कु.स्वरा सागर जाधव या विद्यार्थ्यीनीने कवी कुसुमाग्रज यांचे काव्य वाचन केले.तर दुपारच्या सत्रात मराठी भाषा गौरव दिनाच्या प्रसंगी उपस्थित सन्माननीय प्रमुख पाहुण्या -मा.सौ.वर्षा देवरूखकर
(वाई येथिल.मराठी विश्व कोष ,मध्ये    सहाय्यक संपादक या पदावर कार्यरत)        प्रमुख उपस्थिती-आदरणीय प्राचार्या,    मा.कु .शुभांगी पवार,यांची ही उपस्थिती होती या दिनानिमित्त आमंत्रित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाच्या प्राचार्या यांनी शाल,श्री फळ,व पुष्प गुच्छ देऊन केले.तसेच या दिनानिमित्त विद्यालयातील  मराठी विषय शिक्षक- शिक्षिका मा.श्री          अशोक बेडेकर सरमा.श्री.संभाजी  लांवड सर यांचा सन्मान रेड हाऊस मास्टर(सह      शिक्षक)मा.श्री. प्रमोद लोंढे सर यांनी केला .आणि मा.सौ. आशा पवार मिस सौ.सुहासिनी लेंबे मिस मा.सौ.आरती घनवट मिस मा सौ.स्मिता गायकवाड          मिस यांनाही पुष्प देऊन त्यांना सन्मान  नीत करण्यात आले.सूत्रसंचालक मा.श्री        अशोक बेडेकर सरांनी मराठी       भाषेचा इतिहास मध्ययुग ते आजपर्यंत चा कालखंड व मराठी चा भाषेचा प्रवास कथन केला.
या दिनाचा निमित्ताने प्रमुख पाहुण्यांनी मुलांशी संवाद साधला,
मराठी भाषा संवर्धन काळाची गरज म्हणण्यापेक्षा 'गरजेचा काळ ' कसा आहे हे मार्गदर्शन केले.संवर्धन म्हणजे 'जतन करणे,जपणे,हे मुलांच्या मनावर    बिंबवण्यासाठी विचार मांडले.
मराठी भाषा संवर्धनासाठी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे मराठी भाषा साहित्य लेखन ग्रंथराज्य व्यवहारकोष' निर्मिती व  अष्टप्रधान मंडळ  कार्याचा गौरव केला.तसेच विश्वमाऊली संत ज्ञानेश्वर महाराज आणि इतर संत साहित्य यामधून मराठी भाषा प्रचार-प्रसार कार्याची माहिती दिली.
"मराठी, ही आपली मातृभाषा आहे,ती जगवली पाहिजे, वाढवलीपाहिजे,तीचे    संवर्धन केले पाहिजे "ही भावना त्यांनी व्यक्त केली.तसेच या भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी शासनस्तरावर वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण याच भाषेमध्ये  देण्यासाठी प्रयत्न चालू आहे असे त्यांनी सांगितले.
श्रवण,वाचन,भाषण,संभाषण या चार    क्षमता व भाषेची ही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज १५ते २० ओळी मराठी भाषेचे पुस्तक वाचावे,शब्द कोडी सोडवावी,शब्द साखळी खेळ खेळावे,संतसाहित्य वाचावे ,असे अनेक उपाय भाषा समृद्ध करण्यासाठी सुचविले.
वाई येथील 'मराठी भाषा विश्वकोष मंडळ' स्थापना त्यामागील उद्देश व तेथील ग्रंथ संपदा व वेबसाईट ची मुलांना माहिती दिली 'कुमारविश्वकोष 'याचाही उद्देश विस्ताराने शब्द बद्ध केला.
या दिनाचे औचित्य साधून प्रमुख उपस्थिती असणारे मान्यवर, विद्यालयाच्या प्राचार्या यांनी डायनोसॉर व कार्टून चे उदाहरण देवून नामशेष होणे,किंवा संपुष्टात येणे,यापासून काळानुरुप कसे मराठी भाषेचे संवर्धन करावे हे मार्गदर्शन केले.
'जुने ते सोने'व 'नवे ते हवे ते ही स्वीकारावे' या उक्ती नुसार मराठी भाषा व इग्रंजी भाषा या दोन्हीं वाचावे तसेच जीवन दोन्हीं भाषेने समृद्ध करावे असा संदेश दिला.
प्राचार्याच्या,मार्गदर्शनानंतर सौ.स्मिता गायकवाड मिस यांनी सर्व उपस्थित मान्यवर,प्रमुख पाहुणे, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यी-विद्यार्थ्यांनी या सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रम संपन्न झाला असे घोषित केले.