NC Times

NC Times

"सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक. वाई विभागीय कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजन"


नवचैतन्य टाईम्स वाई (अमोल मांढरे) वाई.13 फेब्रुवारी.-नमस्कार. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाई विभागीय कार्यालय . येथे 12 फेब्रुवारी.रोजी. बँकेच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त. आणि बँकेचे आदरणीय चेअरमन साहेब. श्री नितीन काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त. विभागीय कार्यालय वाई मार्फत भव्य रक्तदान शिबिर आणि नेत्र तपासणी चे नियोजन केले होते. याप्रसंगी बँकेचे कर्मचारी आणि इतर नागरिकांनीही या समारंभाला भव्य आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बँकेचे ग्राहकांबरोबरच सोसायटी मार्फत अनेक जणांनी रक्तदान शिबिरात भाग घेतला. त्याचबरोबर अनेक जणांनी नेत्र तपासणी ही करण्यात आली. याच प्रसंगी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय कार्यालय येथे नियोजनबद्ध आणि यशस्वी आयोजन करण्यात आले.
यावेळी विभागीय विकास अधिकारी वाई. श्री.संजय मांढरे साहेब, बँकेचे सेवक संचालक.श्री. जितेंद्र चौधरी साहेब, मुख्य कार्यालय अधिकारी किरण भोसले साहेब, संपर्क अधिकारी. श्री बबन शिंदे साहेब,, एमपी मार्केटचे अधिकारी श्री सुरेश जगताप साहेब,विकास अधिकारी.सुशांत शिंदे साहेब, आणि प्रवीण सणस, शंकर कदम,धैर्यशील जायगुडे,. पोपट माने, सचिन मोहिते,. अक्षय डेरे, नितीन पिसाळ.आणि त्याचबरोबर इतर कर्मचाऱ्यांनीही या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.  यावेळी वाई शहर शाखेचे. सेवक कविराज अमोल मांढरे. यांनी रक्तदान करून आदरणीय चेअरमन साहेब यांना वाढदिवसाच्या
मनस्वी शुभेच्छा दिल्या. आणि बँकेबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली.नंतर आदरणीय नितीन काका पाटील यांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या सर्वांच्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार केला.आणि कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल समाधानही व्यक्त केले.
विशेषत  सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशात सहकार क्षेत्रात एक अग्रगण्य आणि आदर्श बँक अशी ओळख आहे. बऱ्याच वर्षापासून नाबार्ड आणि इतर सहकार आणि बँकिंग क्षेत्रातले पुरस्कार याच्यावर सातारा जिल्हा बँकेने आपली यशस्वी मोहोर आज पर्यंत ही टिकवून ठेवलेली आहे. याचा सहकार क्षेत्रातील सर्वांना सार्थ अभिमान आहे. आणि सातारा जिल्हा बँकेचे सध्याचे चेअरमन. श्री नितीन काका पाटील यांच्या आदर्श आणि अभ्यासू नेतृत्वामुळे बँकेने सहकार क्षेत्रात सध्या एक उत्तुंग गरुड झेपच घेतलेली आहे. शेतकऱ्यांबरोबरच, सर्वसामान्यांसाठी आणि व्यापारी वर्गासाठी  ही अनेक सुलभ कर्ज योजना, त्याचबरोबर आकर्षक ठेव योजना. आणि वाढत्या शहरीकरणात. बँकेमार्फत विविध अत्याधुनिक. यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. यामुळे  सातारा जिल्हा बँकेचे स्थान हे शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांमध्ये आजही एक आपुलकी आणि सहकार्याची अशीच आहे. तेव्हा याही  पुढे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक. शेतकऱ्यांसाठी  विविध योजनेतून उत्तम. सहकाराचा वारसा कायम  जोपासणे जाईल.हीच सदिच्छा.धन्यवाद.

लेखक. साहित्यिक पत्रकार.
 कविराज अमोल मांढरे. वाई.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. वाई शहर शाखा.
Mobile no.7709246740.