NC Times

NC Times

आजपासून रायवाडीत श्री यल्लम्मा देवीची यात्रा


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) :-  आजपासुन  रायवाडी (ता कवठेमहांकाळ) येथील श्री यल्लम्मा देवीची यात्रा भरणार असुन यात्रे निमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल रहाणार आहे.
       आज बुधवार दिनांक ७  रोजी देवीची बोणी व नैवेद्य असुन   त्यानिमित्त मंदिर परिसरात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.तर सायंकाळी ६ ते रात्री १० यावेळेत मास्टर तानाजी भोसले वाघेरीकर-कराड यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.
         तर गुरुवार दिनांक ८ फेब्रुवारी हा यात्रेचा मुख्य दिवस असुन सदर दिवशी सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत पुन्हा त्याच तमाशाचा कार्यक्रम होणार आहे तर सकाळी १० वाजल्यापासून श्री यल्लम्मा देवीच्या पालखी मिरवणूकीला सुरवात होणार आहे.सदर पालखी मिरवणूक घरोघरी फिरून दुपारी चार नंतर किचासाठी किचाच्या ठिकाणी जाणार आहे.तेथे किचाचा कार्यक्रम होऊन सदरची यात्रा संपणार आहे. 
       तसेच यात्रेनिमित्तच शुक्रवारी दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत ललकार ऑर्केस्ट्रा कोल्हापूर यांचा बहारदार आसा कार्यक्रम होणार आहे.तरी याचा लाभ परिसरातील तमाम भाविक भक्तांनी व व्यापारीवर्गांनी घ्यावा व यात्रा शांततेत पार पाडावी असे आवाहनही यात्रा कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.