NC Times

NC Times

वाढत्या शहरीकरणात कुटुंबातील सुसंवाद जोपासणे गरजेचे...


नवचैतन्य टाईम्स वाई (अमोल मांढरे) 9 फेब्रुवारी
 
सध्या वाढत्या शहरीकरणात कुटुंबातील संवाद जोपासणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये प्रामुख्याने योग्य ती चर्चा होऊन प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी मदतच होईल. पालकांची कर्तव्य हा एक महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे. सध्या सर्वच क्षेत्रात विविध संशोधनामुळे आणि विकासाचा आलेख वाढतच चाललेला आहे.. ही निश्चितच एक कौतुकास्पद बाब आहे. परंतु यामुळेच काही नकारात्मक परिणामही समोर येत आहे. आपली भारतीय संस्कृती जो आपला अभिमान आहे आणि सबंध जगालाही हेवा वाटणारी अशी आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
आज प्रत्येक क्षेत्रात आधुनिक संकल्पना येऊन मानवाचे राहणीमान विशिष्ट दर्जाचे होत आहे. आपल्या देशातला विद्यार्थी वर्ग आज आपल्या देशातच काय तर सातासमुद्रापारही यशस्वीपणे आपली स्वप्ने पूर्ण करीत आहे.. सध्या विद्यार्थी व पालक वर्ग आपल्या भविष्याची निर्णय ठेवताना योग्य तेअभ्यासपूर्वक व योजनाबद्ध निर्णय घेत आहेत. तेव्हा याच प्रसंगी पालकांची काही महत्त्वाची कर्तव्यही आहेत. आज इंटरनेट, मोबाईल, दळणवळण, त्याचबरोबर पाश्‍चिमात्य संस्कृतीचा प्रभाव आपल्या समाजावर बऱ्याच प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची राहणीमानात ही  बराच प्रभाव पडत आहे. आपल्या संस्कृतीचा अभिमान असलेल्या पूर्वीच्या चालीरिती, रूढी परंपरा, आजच्या वाढत्या शहरीकरणात आणि धावत्या स्पर्धेत आजची आधुनिक शैली या दोघांची योग्य ती सांगड घालणं. हे विद्यार्थी व पालकांची आद्य कर्तव्यच आहे. आज मैदानी खेळ व्यायाम आरोग्य, कला-संस्कृती यांकडे विद्यार्थी वर्गाचे गंभीर दुर्लक्ष होऊन विविध शारीरिक व मानसिक आजारांना आमंत्रण मिळत आहे. आपल्याला ज्या थोर महापुरुषांचा आदर्श वारसा आहे, त्या महापुरुषांच्या जीवनातील जडणघडणीत त्यांच्या घरातील संस्कारांचा आणि उत्तम व दर्जेदार विचारांचा विशिष्ट प्रभाव दिसून येतो. हे आपणास विसरून चालणार नाही. तेव्हा पालक वर्ग ही याच प्रसंगी याची गंभीर दखल घेऊन, आपली भारतीय संस्कृती महापुरुषांचा आदर्श, आपली ग्रामीण भागाची ओळख आणि महत्त्व, मातृभाषेचे महत्त्व, स्वदेशीची ओळख, चित्रपटांचे  अंधानुकरण न करणे,व्यसनाधीनता, याचे महत्व मुलांमध्ये आपल्या संस्कार द्वारे योग्य प्रकारे रुजवणे आवश्यकच आहे. त्याच प्रकारे दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांचे करिअर म्हणून क्षेत्रे निवडतांना विद्यार्थ्यांची कल , क्षमता आवड हे जाणून विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्यातील करिअर निवडण्यास सहकार्य करावे. विविध शाखेची महाविद्यालय, प्रवेश परीक्षा, कलचाचणी त्याचबरोबर कोचिंग क्लासेस यांच्या मध्ये विद्यार्थ्यांना जणू आपल्याकडे ओढण्याची स्पर्धाच चाललेली दिसून येत आहे. तेव्हा पालकांनी ही कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता व योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोरो ना च्या महा संकटानंतर आता शासनाने सर्व शाळा व कॉलेज चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. गेली दोन वर्ष विद्यार्थी ही शाळेपासून वंचितच राहिले आहेत. त्यामुळे बराच काळ शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील थेट संबंध दिसून आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी ही गंभीरच बाब आहे. आपल्या समाजात पूर्वीपासूनच आदर्श गुरुकुलाची परंपरा आहे. त्याचबरोबर आजही विविध दर्जेदार शिक्षण संस्था व विद्यापीठे ही सर्वच विद्यार्थ्यांना आकर्षित करीत असतात. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यात योग्य ते ताळमेळ घेऊन याचबरोबर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी दोघांमध्ये सुसंवाद होणे आवश्यक आहे. तेव्हा पालक वर्ग विद्यार्थी व शाळा प्रशासन यांमध्ये त्रिसूत्री कार्यक्रम राबवणे हे योग्य ठरेल. आपल्या देशाच्या आजचा विद्यार्थीच उद्याचा भविष्यातील आधारस्तंभ आहेत. त्याचबरोबर पालकांनीही आणि विद्यार्थ्‍यांनी योग्य तेअभ्यास पूर्वक निर्णय घेऊन पारंपारिक क्षेत्राबरोबर आजच्या आधुनिक क्षेत्रातील अभ्यासक्रम निवडणे गरजेचे आहे.तेव्हा जगाच्या पाठीवरील आदर्श असलेल्या आपल्या भारत राष्ट्राची ओळख ही भविष्यातही कायम ठेवणे हे विद्यार्थी वर्ग व पालकांचे आद्य कर्तव्यच आहे. आणि वाढत्या शहरीकरणात पालकांचे कर्तव्य यावर योग्य ती चर्चा झालेलीच आहे. आणि शहरीकरणात कुटुंबातील सुसंवाद जोपासावे याचे महत्त्व या लेखाद्वारे आपण सर्वांसमोर स्पष्ट झालेच असेल. धन्यवाद.
कविराज अमोल मांढरे. वाई. जिल्हा सातारा..
Mobile no.7709246740