NC Times

NC Times

"चला आपली माय मराठी समृद्ध करूया"


नवचैतन्य टाईम्स वाई (अमोल मांढरे) वाई.27. फेब्रुवारी.
महाराष्ट्र ही थोर संतांची पवित्र भूमी मानली जाते. आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. संतांनी आणि आपल्या महापुरुषांनी आपल्या काव्यातून ग्रंथातून आणि शिकवणीतून जनसामान्यांना थोर व प्रगल्भ ज्ञान दिले. आणि हे सर्व आपले मराठी मातृभाषेतूनच. याचा आपल्या सर्व मराठी माणसांना सार्थ अभिमानच आहे. तेव्हा आपल्या या मराठी मातृभाषा टिकवण्यासाठी जन माणसांबरोबर शासनानेही गंभीर पावले उचलणे गरजेचे आहे. आपल्या महापुरुषांनी जी थोर शिकवणूक दिली त्यापासून मिळणारी ऊर्जा ही शेकडो वर्षापासून आजही टिकून आहे. आणि हीच ऊर्जा आपल्या मराठी माणसांसाठी संकटांशी लढण्यासाठी एक संजीवनीचआहे. तेव्हा आपल्या या माय मराठीच्या समृद्धीसाठी प्रत्येक शाळेत मराठी भाषा अनिवार्य करणे गरजेचे आहे. वाढत्या स्पर्धेत आणि जागतिकीकरणामुळे इंग्रजीला आपण आपल्या जीवनात योग्य स्थान दिले आहेच. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मराठी विद्यार्थ्यांनी जागतिकीकरणात नवनवीन क्षेत्रांचे आव्हान स्वीकारणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने पारंपरिक करियर च्या आव्हान बरोबरच,आता नवीन क्षेत्र त्यांना भविष्यातील उत्तम करियरसाठी खुणावत आहेत. परंतु आपल्या मराठी विद्यार्थ्यांना मी एक जबाबदारी म्हणून त्यांना आव्हान करतो की तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवनवीन यशाची शिखरे नक्कीच जिंका, परंतु यशस्वी झाल्यानंतर जगाच्या पाठीवर कुठेही असताना आपली माय मराठी मातृभाषा मराठी चे महात्म्य आणि पवित्र कायम एक आदर्श म्हणूनच ठेवा. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श स्वराज्याची ओळख ही जगात तितक्याच उंचीवर नक्कीच ठेवाल हीच सदिच्छा. त्याचबरोबर इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे आकर्षण मागील काही वर्षात सर्वत्र वाढले होते. परंतु आता आपल्या शासनाच्या उत्तम धोरणामुळे, आणि काही जाणकारांनी केलेल्या अथक पाठपुराव्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांनाही आत्ता उत्तम दर्जेदार शिक्षण, उच्चशिक्षित व जाणकार शिक्षक वर्ग , आणि त्याच बरोबर आधुनिक सुविधा यामुळे माता मराठी माध्यमाच्या शाळांकडे ही विद्यार्थी व पालक बहुसंख्येने आकर्षित होत आहेत. आणि हे आपल्या मराठी भाषेच्या भविष्यातील संवर्धनासाठी, एक सकारात्मक पाऊल ठरेल. त्याचबरोबर शासनालाही एक विनंती आहे की त्यांनी शालेय पाठ्यपुस्तकात आपल्या महापुरुषांचा जो आदर्श आहे त्यांची योग्य व सविस्तर माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या दृष्टीने शालेय अभ्यासक्रमातही त्यांचा समावेश करावा. . या पवित्र कार्यासाठी आपण सर्व पत्रकार बांधव व साहित्यिक यांनी हे आपले आद्य कर्तव्य समजून मोलाचे योगदान देण्याची गरजेचे आहे. साहित्य संमेलन, व्याख्यानमाला व कवी संमेलन यांच्यामार्फत मराठी मातृभाषा समृद्ध तर होईलच परंतु त्याचबरोबर दर्जेदार मराठी चित्रपट ,व नाटक यामुळे नवीन पिढीलाही मराठी भाषेचे महत्व कळेल.
आणि विशेष म्हणजे मराठी भाषेच्या समृद्धीसाठी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांनी पक्षीय, वैचारिक मतभेद बाजूला ठेवून या कार्यात सहभागी व्हावे. तेव्हा सर्व आबालवृद्धांची लाडकी मराठी भाषा ही पुढील शेकडो वर्षे अशीच चिरंतर आणि समृद्ध राहू दे आणि आपल्या सर्वांना ज्ञान देऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.
मी मराठी. रंग मराठी.
कविराज अमोल मांढरे. वाई जिल्हा सातारा.
Mobile no.7709246740.