NC Times

NC Times

नांगोळे गावच्या विकासात्मक कामाची तृप्ती दोडमिसे यांच्या कडून पहाणी


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- नांगोळे (ता कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने विविध योजनेतून केलेल्या विविध विकासात्मक कामाची पाहणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी करुन अगदी समाधान व्यक्त केले.
      यामध्ये तालुकास्तरीय प्लास्टिक संकलन केंद्र,आरोग्य केंद्रा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना,शुन्य कचरा व्यवस्थापन,जिल्हा परिषद मॉडेल स्कूल त्याचबरोबर आमदार व खासदार फंडातून झालेली विविध प्रकारची विकास कामे,क वर्ग तिर्थक्षेत्र,ई व्हेईकल चार्जींंग स्टेशन,ग्रामपंचायतीची स्पर्धा परीक्षा अभ्यासिका याची पहाणी केली त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या मार्फतच राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचीही त्यांनी माहिती घेतली. 
         तसेच माझी वसुंधरा अभियान ४.० या योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही यावेळी घेण्यात आले.यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे म्हणाल्या की  'नांगोळे गावाचा आदर्श इतर गावांनी घ्यावा लागेल इतके आदर्शवत गाव बनल्याचे सांगुन या गावाने यापुढेही प्रत्येक योजनेसह स्पर्धेत उतरण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 
       यावेळी गटविकास आधिकार उदयकुमार कुसुरकर,विस्ताराधिकारी डी आर गुरव,के आर पाटील,शिक्षणधिकारी प्रमोद गोफणे,उप अभियंता के डी साळुंखे,माजी सभापती दादासाहेब कोळेकर,सरपंच सौ छायाताई कोळेकर,उपसरपंच दादासाहेब हुबाले,ग्रामसेविका धनश्री पोळ-पाटीलसह सर्व सदस्य,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत प्रास्ताविक दादासाहेब कोळेकर यांनी तर आभार धनश्री पोळ-पाटील यांनी मानले.यावेळी अगदी उत्कृष्ट व आदर्शवत काम करणाऱ्या ग्रामसेविका धनश्री पोळ-पाटील यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला.