NC Times

NC Times

साहित्यातून प्रबोधनाकडे वाटचाल. करणारे कविराज अमोल मांढरे...


नवचैतन्य टाईम्स वाई (अमोल मांढरे) वाई.29. फेब्रुवारी.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यकार
कविराज अमोल मांढरे. वाई. जिल्हा सातारा. यांनी आपल्या लेखनातून साहित्य क्षेत्रात स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा हा साहित्य प्रवास बर्‍याच वर्षाच्या संघर्षाचा आहे. बारावी सायन्स मध्ये अपयश आल्यानंतर सुद्धा नैराश्य सोडून यशाला खेचून आणण्याची क्षमता आपल्यातही आहे हे मनात ठसवून त्यांनी जिद्दीने व आपल्या परिश्रमाने साहित्य क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी आत्तापर्यंत सुमारे ऐंशी कवी संमेलनातून विविध सामाजिक प्रश्नांवर समाजप्रबोधनाचे काम केलेले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातल्या वृत्तपत्र मासिक व पोर्टल द्वारे विविध विषयांवर आपले मत मांडले आहे. व्यसनमुक्ती, नापास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ,आदर्श गणेश उत्सव ,युवकांनी संघटित व्हावे ,गाव तेथे ग्रंथालय ,आपला बळीराजा आणि वीर जवानांचे महात्म्य, क्रिकेट बरोबर इतर खेळांनाही प्रोत्साहन द्यावे ,स्पर्धा परीक्षांचे महत्व ,त्याचबरोबर शासनाची जबाबदारी, परराष्ट्र धोरण, आणि कोरो नाबद्दल जनजागृती, लॉक डाऊन मध्ये खास विद्यार्थ्यांशी हितगुज, लोकसहभागातूनच कोरो ना चीसमस्या सुटेल, आणि मराठी पाऊल पडते पुढे ,दिल्ली चे तख्त राखतो महाराष्ट्र ,आई थोर तुझे उपकार, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र जगासमोर एक आदर्श, लोकशाहीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,अशा विविध विषयांमधील स्वतःच्या कौशल्य द्वारे आणि लेखणीने साहित्यक्षेत्रात एका उंचीवर स्वतःचे नाव पोचलेले आहे.. महाराष्ट्र राज्याला सहकाराचा आदर्श, नापास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आणि  परिपूर्ण मार्गदर्शन, ग्रामोद्धार हाच राज्याच्या विकासाचा पाया, एमआयडीसीतील कामगारांचे प्रश्न शासनाने गंभीरतेने घ्यावे, ग्रंथालय नवनिर्मितीचे प्रेरणास्थान, तरुणांनो साहित्य प्रेमी व्हा, भारत एक युवाशक्ती राष्ट्र, युवकांनी देशाच्या विकासात सहभागी व्हावे. लोकसहभागातूनच विकास करावा.अशी संपादकीय आणि विशेष लेख महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध वर्तमानपत्र प्रकाशित झाले आहेत. या साहित्य क्षेत्रातील उत्तम योगदानामुळेच त्यांना महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार, शिवजयंती महोत्सव पुणे ,राज्यस्तरीय माझी माई पुरस्कार, स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय पुरस्कार, छंदोगामात्य सन्मान, मी भारतीय kovid राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार ,राज्यस्तरीय आदर्श कलारत्न पुरस्कार .अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या संघर्ष काळात एमआयडीसी मध्ये वॉचमनची देखील नोकरी केली. सध्या देशातील सहकाराचा एक आदर्श असा असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे कार्यरत आहेत. कोरो ना संकटातही सर्वसामान्यांसाठी व शेतकऱ्यांसाठी मदत कार्य करणाऱ्या अशा त्या बँकेचा त्यांना एक विशिष्ट अभिमान आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याला जो सहकार चळवळीचा जो आदर्श आहे तोच आदर्श वारसा पुढेही सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक कायम ठेवेल. याचा त्यांना अभिमान आहे.
तसेच ते मराठी साहित्य क्षेत्रात बरोबरच आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात , छत्तीसगड, बिहार, उत्तराखंड, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यातील हिंदी साहित्य संस्थान  बरोबर ते हिंदी साहित्य शेत्रात मुशाफिरी करत आहेत. विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहेत. साहित्यरत्न सन्मान, राष्ट्र गौरव लेखन सन्मान,. हिंदी साहित्य दिनकर सन्मान .असे विविध पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच त्यांची अनेक राष्ट्रीय हिंदी काव्यसंग्रहात ही उस्फुर्त सहभाग आहे. तसेच त्यांनी नुकताच अमेरिका येथील आपल्या एका भारतीय हिंदी साप्ताहिक का मध्येही नया भारत, हिंदुस्तानी कवी, कहानी एक साहित्य पत्रकार की, आदर्श स्वराज्य  या कवितेद्वारे सातासमुद्रापार ही आपली विशिष्ट अशी ओळख निर्माण केलेली आहे त्याचबरोबर किसन वीर कॉलेज वाई येथे त्यांचा माजी विद्यार्थी म्हणून साहित्य क्षेत्रातील उत्तम योगदानाबद्दल कॉलेजचे प्राचार्य यांच्या हस्ते सत्कार झाला. त्याचबरोबर कवठे तालुका वाई येथील माध्यमिक शाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना समाज प्रबोधन पर मार्गदर्शन केले. तिथेही त्या शाळेचे ज्येष्ठ संचालकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून सन्मानित केले. त्याचबरोबर पाचगणी येथील सर आईन्स्टाईन ॲकॅडमी या शाळेमध्ये ही त्यांना निमंत्रित कवी म्हणून आमंत्रित केले. आणि विशेष म्हणजे पुणे येथील  स्पर्धा परीक्षांना अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या लेखनातून योग्य ते मार्गदर्शन करीत आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्या नवचैतन्य टाईम्स या वृत्तपत्राशी ते बरेच दिवसापासून जोडले गेले आहेत. त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर विविध प्रकारचे उत्कृष्ट प्रबोधनात्मक लेख लिहिले आहेत. त्यामुळे नवचैतन्य टाईम्स या वृत्तपत्र समूहाचे ते विशेष आभारी आहेत. आणि याचा त्यांना सार्थ अभिमानच आहे. त्याचबरोबर आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन या राष्ट्रीय पत्रकार संघटनेत ते नुकतेच वाई तालुका अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. व यापुढे पत्रकारांचे समाज प्रबोधन हे एक मात्र आद्य कर्तव्य असून  निर्भीडपणे ते कार्य भविष्यात समाजासाठी स्वतःला झोकून द्यावे. असा त्यांचा मानस आहे.
तसेच संभाजीनगर येथील सामाजिक संस्थेतर्फे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय साहित्य गौरव पुरस्कार प्रदान केला आहे. त्याचबरोबर नुकताच त्यांना बेस्ट राईट हा साहित्य गौरव पुरस्कार देण्यात आला. आणि लिटरेचर अवॉर्ड फॉर द इयर 2023. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना नुकताच प्रदान करण्यात आला त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच आळंदी पुणे येथे मातृ रक्षा सन्मान हा साहित्य व सामाजिक कार्य. यासाठी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे. पत्रकारितेमुळेच आपल्याला बहुमूल्य स्वातंत्र्य मिळालेले आणि हे निर्विवाद सत्यच आहे.आणि आपल्या महाराष्ट्राचा आदर्श प्रबोधनाचा वारसा आपण सर्व साहित्यिकांनी आपले आद्य कर्तव्य समजून जोपासणे गरजेचे आहे.असे विचारही अमोल मांढरे आपल्या युवकांना मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे म्हणजे शिक्षण म्हणजे आपल्यासाठी एक वाघिणीचे दूधच असते.आणि त्याचे फळ भविष्यात विद्यार्थ्यांना नक्कीच मिळते. हे विद्यार्थ्यांनी आपल्या मनात ठामपणे सांगून शिक्षण क्षेत्रानंतर कुटुंबाबरोबर समाज हिताचे कार्य हे जोपासणे गरजेचे असा संदेशही ते देतात.यामुळेच भविष्यात साहित्य क्षेत्रात अजून नव्या उमेदीने काम करण्यासाठी एक नवी ऊर्जा मिळेल. तसेच भविष्यातही आपले पाय जमिनीवरच ठेवून समाजातील साहित्यप्रेमी ,थोरांचा आशीर्वाद आणि मित्र परिवाराच्या सहाय्याने साहित्यक्षेत्रात आपल्या लेखणीने समाजप्रबोधनाचे काम निपक्ष व निर्भीडपणे चालूच ठेवतील असा त्यांचा विश्वास आहे. धन्यवाद.
जय हिंद. जय भारत.जय महाराष्ट्र.
कविराज अमोल मांढरे.वाई.जिल्हा सातारा.
Mobile no.7709246740.
 
.