NC Times

NC Times

घाटनांद्रेत बाळासाहेब ठाकरे वाचनालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न




नवचैतन्य टाईम्स
 घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथे शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या विशेष फंडातून व शिवसेनेचे बाळासाहेब शिंदे (ठाकरे) व सचिन शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातुन मंजूर झालेल्या दहा लाख रुपये निर्धारित खर्चातून उभ्या राहिलेल्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे वाचनालयाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी शिवसेनाचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महिंद्र चंडाळे,शिवसेना नेते दिनकर (तात्या) पाटील,माजी उपसभापती अनिल (दादा) शिंदेसह मान्यवर उपस्थित होते. 
         
 प्रारंभी शिवसेना जिल्हाप्रमुख महिंद्र चंडाळे व शिवसेना नेते दिनकर (तात्या) पाटील यांच्या संयुक्त हस्ते फीत कापुन विधीवत उदघाटन करण्यात आले.तदनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
      यावेळी बोलताना महिंद्र चंडाळे म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात शिवसेनेचा मोठा सिंहाचा वाटा असुन म्हैशाळ,ताकारी व टेंभू योजनेची मुहूर्तमेढही तात्कालीन शिवसेना सरकारच्याच काळातच झाली असून उड्डाण पुल,रस्त्याच्या चौपदरीकरणाची सुरवात ही त्याची मोठी उदाहरणे आसल्याचे सांगितले तर सर्वांगीण विकासासाठी भविष्यात शिवसेने शिवाय महाराष्ट्रला पर्याय नसल्याचे शिवसेना नेते दिनकर तात्या पाटील यांनी यावेळी ठसुन सांगितले. 
         यावेळी जिल्हा प्रमुख महिंद्र चंडाळे,शिवसेना नेते दिनकर (तात्या) पाटील,सौ स्नेहल पाटील (वहिनी),माजी उपसभापती अनिल (दादा) शिंदे,तासगाव तालुका शिवसेना प्रमुख संजय (दाजी) चव्हाण,युवा सेनेचे संपत दुधाळ,बाळासाहेब शिंदे (ठाकरे),घाटनांद्रेचे शाखाप्रमुख सचिन शिंदे,सुरेश शिंदे,अरविंद शिंदे,प्रविण शिंदे,बाळासाहेब शिंदे,पोपट पाटील,रमेश कुलकर्णी,महादेव पवार,विठ्ठल शिंदे,अंकुश शिंदेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत बाळासाहेब शिंदे यांनी तर आभार सचिन शिंदे यांनी मानले.

Tags