NC Times

NC Times

घाटनांद्रे येथील उषाताई सदाशिव गुरव यांचे अपघाती दुःखद निधन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील प्रतिष्ठीत महिला नागरिक सौ उषाताई सदाशिव गुरव (वय-७५) यांचे शनिवारी रात्री अपघाती दुःखद निधन झाले.त्या माजी सैनिक व घाटनांद्रे विकास सोसायटीचे विद्यमान संचालक सदाशिव गुरव यांच्या पत्नी होत.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,तीन मुली,जावई व नातवंडे असा परिवार असुन,रक्षाविसर्जन सोमवार दिनांक १२ रोजी सकाळी नऊ वाजता घाटनांद्रे येथे घेण्यात आले आहे.