NC Times

NC Times

घाटनांद्रेत सर्वोदय हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा कार्यक्रम सोहळा संपन्न




नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील सर्वोदय हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी मान्यवरांसह,शिक्षक,पालक,ग्रामस्थांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी एस शिंदे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रविण शिंदे उपस्थित होते.
        प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.तदनंतर उपस्थित मान्यवरांसह शिक्षक,विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व दहावीच्या परिक्षेसाठी शुभेच्छा व पुढील वाटचालीस सध्दिच्छापर मनोगते व्यक्त केली.तर शाळेचा निरोप स्वीकारताना दहावीच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्याच्या कडा पानवताना दिसत होत्या.आपल्या शैक्षणिक दृष्ट्या शाळेचा हा शेवटचा दिवस असल्याने ते शाळेचे आवार पुन्हा पुन्हा न्याहाळताना दिसत होते. 
        यावेळी आपल्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापक बी एस शिंदे म्हणाले की आपल्या करिअरच्या दृष्टीने दहावीचे वर्ष हे आयुष्याला एक वळण देणारे आसते.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वताची क्षमता,गुणवत्ता व जबाबदारी ओळखुनच आपल्या शैक्षणिक प्रवासामध्ये विकसित करावे म्हणजे यश हे आपलेच आसते तर जयसिंग बोबडे यांनीही यावेळी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन व स्वताची जिद्द व कष्ट याचा वापर केल्यास कोणतीही शक्ती तुम्हाला यशा पासून रोखू शकणार नसल्याचे ठामपणे सांगितले. 
        यावेळी नामदेव शिंदे,प्रविण शिंदे,प्रकाश वाघमोडेसह काही विद्यार्थ्यांनाही आपले मनोगत व्यक्त केले.शेवटी आभार प्रकाश वाघमोडे यांनी मानले.यावेळी माजी सरपंच माणिकराव जाधव,संचालक सर्वश्री नारायण शिंदे,नामदेव शिंदे,कुंदन पवार,मुख्याध्यापक बी एस शिंदे,शिक्षक सर्वश्री साधना धेंडे-कांबळे,प्रकाश वाघमोडे,लक्ष्मण लवटे,भारत काळे,दिलीप खाडे,जयसिंग बोबडे,शोभा शिंदे-पाटील,जयानंद स्वामी,सचिन पाटील,बाळासाहेब रास्ते,साहील पवार,स्कूल कमिटीचे संतोष शिंदे,गौतम कांबळे,संतोष जाधवसह शिक्षक,पालक,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.