NC Times

NC Times

आज छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श चरित्र अभ्यासणे गरजेचे


नवचैतन्य टाईम्स वाई (अमोल मांढरे)-19.फेब्रुवारी.सबंध हिंदुस्थानामध्ये असंख्य युवक छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानतात. छत्रपती शिवाजी महाराज कि जय हे घोषवाक्य ऐकल्यावर सर्वांच्या मनात एक प्रेरणा येते व आपल्या आदर्श स्वराज्याची सर्वांना आठवण येते. आजच्या युवा पिढीला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श व त्यांचा आदर्श इतिहास अभ्यासणे अत्यंत गरजेचे आहे. मीही त्यातला एक युवकच अपयशाच्या पायऱ्या चढून यशाकडे वाटचाल करीत आहे परंतु या सबंध वाटचालीत छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून मी सुरुवात केली व शेवट पर्यंत त्यांची प्रेरणा घेऊन सदैव प्रयत्नशील राहील .
. होते शिवराय म्हणून घडला महाराष्ट्र
 म्हणून एक मुखाने म्हणतो आपण जय महाराष्ट्र.
सह्याद्रीच्या कपारीत करून घोडदौड
कापत शत्रुची मान फडकविले भगवे निशाण. हेवा वाटतो महाराष्ट्राचा साऱ्या जगाला. उभा महाराष्ट्र ताठमानेने उभा.
आज मी छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण हा विषय आपल्या समोर मांडत आहे. इतिहासातून आपण नेहमी शिकत राहावे ही आपल्या थोरांची शिकवणूक आहे. आपल्या महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बघितल्यावर कळते की तेव्हा आपल्यावर मुघलांचे राज्य होते. सामान्य प्रजेवर मुघलांचे अतोनात अत्याचार होत होते. सामान्य जनतेचा कोणी वाली नव्हता. मोगलांच्या राजवटीला विरोध करण्यास कोणी तयार नव्हते. सामान्य जनता आता अतिशय त्रासली होती.तेव्हा या आपल्या महाराष्ट्राच्या पवित्र मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.लहानपणापासूनच वडील शहाजी राजे व मातोश्री जिजाऊ यांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले.त्याचबरोबर थोर संतांची शिकवण व स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले.तेव्हा मुगलांच्या राजवटीला विरोध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याच राज्यातील मावळ्यांना एकत्र करून निधड्या छातीने मुघलांच्या साम्राज्याला लढा दिला.आणि एका हातात तलवार तर दुसर्‍या हातात ढाल घेऊन अजोड पराक्रम करून मोगलांच्या राजवटीला संपविले. व आपल्या लोकांसाठी एक आदर्श स्वराज्य निर्माण केले. तेव्हाचा युवक छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानत होता. तेव्हाच्या माता-भगिनी निर्भीडपणे जगत होत्या. अत्याचार करण्यास कोणीही पुढे येत नव्हते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची कडक शासन व्यवस्था तेव्हा होती. तेव्हाचा आपला बळीराजा कधीही आत्महत्या करत नव्हता. कारण दुष्काळाच्या संकटात छत्रपती शिवाजी महाराजांची मायेची सावली आपल्या बळीराजावर होती.
आजच्या आपल्या युवक वर्गाला छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श चरित्र अभ्यासने अत्यंत गरजेचे आहे. आपली युवाशक्ती ही आज जागतिक पातळीवर एक ताकद म्हणून ओळखली जाते. आज समाजात अनेक प्रश्न विकासाच्या आड येथे आहेत. बेरोजगारी भ्रष्टाचार व्यसनाधिनता ,शेतकरी आत्महत्या, त्याच बरोबर परराष्ट्र धोरण या समस्या आपल्याला भेडसावत आहेत. तेव्हा या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी आजच्या युवक वर्ग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पैलू अभ्यासणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचा विकास नक्कीच होईल त्याचबरोबर आपली युवा शक्ती ही जागतिक पातळीवर एक महाशक्ती म्हणून नक्कीच उदयास येईल यात तिळमात्र शंका नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीतून असे स्पष्ट होते की विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता कला, क्रीडा, आरोग्य, संस्कृती ,देश हित या विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवावे. तसेच युवक वर्गाने आपल्या कुटुंबाबरोबर समाजहित जोपासणे गरजेचे आहे.आपला बळीराजा आणि आपला वीर जवान हे आपल्या प्राणाची पर्वा न करता आपल्या देशासाठी लढा देत आहेत. तेव्हा आपल्या युवक वर्गाने यांचा अभिमान बाळगावा व आपले कर्तव्य पार पाडावे
      छत्रपती शिवाजी महाराजांनी कशाचीही पर्वा न करता राष्ट्रहित हे  एकमात्र उद्दिष्ट समोर ठेवून आयुष्यभर आदर्श स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जेव्हा जेव्हा आपल्या. स्वराज्यावर संकट आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः हिमतीने पुढे येऊन सर्व जनतेला विश्वासात घेऊन गनिमीकाव्याने युद्धनितीचा वापर करून आदर्श स्वराज्य निर्माण तेव्हा आजच्या कोरो ना संकट काळातही आपण त्यांच्या याच युद्धनितीचा वापर करून अभ्यासपूर्वक आराखडा आखून  या संकटावर नक्कीच मात करू. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र म्हणजे आज जगातील विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आणि अभ्यासपूर्ण विद्यापीठाचआहे. आज जागतिक स्तरावर कोरोना रुपी राक्षसी संकटाचे सावट गडद झालेले तेव्हा आपण सर्वांनी शिवचरित्राचा अभ्यास करावा व त्याचे अनुकरण करून या संकटाला नक्कीच सडेतोड उत्तर देऊ.आणि तसे बघितले तर आज जगातील काही बलाढ्य देशातही शिवचरित्राचा आणि गनिमी काव्याचा अभ्यास करून तेथील युद्धनीती ठरवली तेव्हा आपण सर्वांनी याचा आदर्श भविष्यातही कायम ठेवू या.व हेच आपले आदर्श स्वराज्य आज जगासमोर एक आदर्श म्हणून ओळखले जाते. तेव्हा आपल्या समाजातील सर्व लहान थोरांनी  एक संकल्प करूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श चरित्र अभ्यासावे. याचा निश्चितच एक सकारात्मक परिणाम दिसून येईल. धन्यवाद. जय महाराष्ट्..
कविराज अमोल मांढरे वाई. जिल्हा सातारा.
Mobile no.7709246740