NC Times

NC Times

आरोग्यावर बोलू काही


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)                                                             मध आणि लिंबू सेवन करण्याचे पाच मोठे फायदे                                                १)मध-लिंबू प्यायल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते.मध आणि लिंबूमध्ये असलेले अँन्टीॲक्सीडेंट्स प्रतिकारक क्षमता वाढवतात.                          २)तात्काळ शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी याचे सेवन करणे फायद्याचे ठरते.मधात नैसर्गिकदृष्ट्या कार्बोहाइड्रेट असते.हे खाल्याने शरिरात उर्जेचा स्तर वाढतो आणि यात लिंबू टाकला तर उर्जा तर अधिक वाढते आणि तुमचा मूडही चांगला होतो.                    ३) वजन कमी करण्यासाठी मध- लिंबू  सेवन खूप फायद्याचे ठरते.लिंबूमध्ये विरघळणारे फायबर पँकटिनचे प्रमाण अधिक असते.ते वजन कमी करण्यासाठी फायद्याचे  असते.हे खाणे वजन कमी करण्यासाठी एक घरगुती उपाय आहे.                        ४) मध रोज खाल्याने त्वचा डीटॉक्सिफाइड होते.आणि त्वचेवर संक्रमण आणि ॲलर्जीचा धोका कमी होतो.    ५)लिंबूच्या रसात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन सी आणि मधामध्ये एन्टीबँटेरियल तत्व असतात.जे शरिरातून टॉक्सिन्स काढतात.लिंबू आणि मध सेवन आतड्यांमधील चांगले बॕक्टेरिया वाढवतात आणि पचनक्रिया चांगली होते.