NC Times

NC Times

स्वतंत्र माहिती अधिकार अंतर्गत प्राथमिक माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यशाळा,आटपाडी पंचायत समिती सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न


नवचैतन्य  टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)   दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी नियोजित वेळेत स्वतंत्र माहिती अधिकार अंतर्गत प्राथमिक माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यशाळा, मोठ्या दिमाखात पंचायत समिती सभागृह या ठिकाणी पार पडली.
या कार्यक्रमाला मा. संपादक शाहीन शेख साहेब(माहिती अधिकार व्याख्याते) प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रशासकीय अधिकारी मा. प्रशांत चंदनशिवे साहेब व पोलीस उपनिरीक्षक साहेब, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री.देवानंद जावीर साहेब, बहुजनांचे उगवते नेतृत्व. मा.श्री. संतोष हेगडे साहेब (भावी आमदार),व धनंजय जावीर साहेब व मा.श्री.राजेंद्र बापू खरात (रिपाई जिल्हाध्यक्ष)व ज्येष्ठ राजकीय नेते मा.अनिल भाऊ, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष ( परिवहन) बौद्धाचार्य बाळासाहेब वाघमारे यांचे हस्ते संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाले.
या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक. सम्यक सेवाभावी संस्था अध्यक्ष.मा. श्री. दत्तात्रय जावीर साहेब.व मा. श्री गोरख जावीर,(उपाध्यक्ष) मा.श्री.पांडुरंग मोरे(सचिव), मा.श्री.विनायक जावीर सर उपस्थित होते.

मा.श्री.दत्तात्रय हातेकर व मा.श्री.संतोष रणदिवे यांची (स्वतंत्र माहिती अधिकार आटपाडी तालुका प्रतिनिधी) म्हणून मा. संपादक शाहीन शेख यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मा.श्री राहुल साबळे , अजित रणदिवे (सामाजिक कार्यकर्ते) शिवाजी सावंत, आटपाडीचे पिंटू ऐवळे,(पत्रकार)महेश काटे, संपत जावीर, (पत्रकार) राजू शेख, (पत्रकार)अशोक पवार, शेतकरी संघटनेचे नेते जुगदर साहेब. एडवोकेट सातपुते साहेब, सतीश रणदिवे, ईश्वर जावीर साहेब, सिद्धेश्वर गायकवाड, सतीश जावीर, सुनील रणदिवे, दिग्विजय जावीर, अजिंक्य जावीर, नितीन केंगार, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.आटपाडी तालुक्यातील राजेवाडी, दिघंची, पुजारवाडी,आटपाडी, करगणी, झरे, घरनिकी, व इतर तालुक्यातून सांगली जिल्ह्यातून अनेक सामाजिक कार्यकर्ते, महिला वर्ग उपस्थित होते.
माहिती अधिकार व्याख्याते शाहीन शेख यांनी माहिती अधिकार कायद्यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले.