NC Times

NC Times

आयुष मँट्रोमोनी विवाह संस्थेमार्फत 25 फेब्रुवारी रोजी कल्याण येथे माळी समाज वधूवर मेळाव्याचे आयोजन


नवचैतन्य टाईम्स मुंबई (प्रतिनिधी)- माळी समाज वधूवर मेळावा कल्याण येथे रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत माळी समाज वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे मेळाव्यात या ना त्या निमित्ताने महाराष्ट्र व  महाराष्ट्राबाहेर स्थायिक झालेल्या माळी कुटुंबातील मुलामुलींसाठी आपल्या समाजातील जोडीदार निवडण्याची संधी या मेळाव्याच्या निमित्ताने  मिळणार असल्याचे समाधान त्यांना होणार आहे.
आयुष मँट्रोमोनी विवाह’ संस्थेच्या वतीने माळी समाजातील वधू-वर सोहळ्याचे आयोजन खासकरून रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी स्वामी नारायण हॉल गजानन हायस्कूल शेजारी कल्याण महापालिकेसमोर शंकरराव चौक कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आले असुन विवाह संस्थेकडुन वधूवरांचे नाव नोंदणी केलेले फॉर्म(बायोडाटा) भिंतीवर लावण्यात येणार नाही किंवा प्रोजेक्टरच्या माध्यमातून स्क्रीनवर दाखविण्यात येणार नसल्याचे माहिती आयोजकाकडुन करण्यात आली असुन कार्यक्रमाच्या दिवशीच नाव नोंदणी करणाऱ्या वधू वरांनी आणि वधूवर अनुपस्थित असल्यास पालकांनी व्यासपीठावर येऊन परिचय द्यावयाचा आहे.दोघेही नसल्यास आयोजकांकडून बायोडाटाचे वाचन करण्यात येईल तसेच www.ayushmatrimony.com या वेबसाईटवर नोंदणी करणाऱ्याना 1000 रुपयाचा प्लान मोफत देण्यात येणार असुन वेबसाईटसाठी वेगळे शुल्क आकारण्यात येणार नाही सदर मेळावा शुल्क आकारण्यात येणार नाही मात्र 1वर्षे कालावधी साठी 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे तरी देशभर पसरलेल्या माळी कुटुंबांसाठी हा वधूवर मेळावा आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती या आयुष्य मँट्रोमोनी विवाह’ सोहळ्याचे संचालक अनिल काकडे यांनी दिली.अधिक माहिती  साठी संपर्क  क्र. 8104211818  / 9324552963