NC Times

NC Times

सांगली येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थ्यांनी कु. संयोगिता कदम ठरली सुवर्णपदकाची मानकरी


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) :-
सांगली येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता सातवीतील विद्यार्थींनी कु संयोगिता मंगेश कदम हीने ठाणे येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धा २०२३-२४ मध्ये १४ वर्षे वयोगटा खालील गटात सुवर्णपदक मिळवले असुन तीच्या या यशाचे परिसरातून कौतुक केले जात आहे.तीला याकामी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य जी बी पाटील,शाळेचे क्रिडा शिक्षक सुजित वाघमोडे,जिद्दी स्पोर्ट्स फाऊंडेशनचे प्रथमेश लोंढे,काजल लोंढे सह शिक्षक,पालक,शाळेच्या कर्मचाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.तीला याकामी तीचे आजोबा व सेवानिवृत्त प्राध्यापक जे बी कदम यांनी विशेष प्रेरित केले.