NC Times

NC Times

आरोग्यावर बोलू काही




नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)                                                              अनेक प्रकारच्या आजारावर रामबाण उपायः- एरंडेल तेल....                                                             रात्रीच जागरण, अवेळी झोपण,उठण,यामुळे अनेकांना पित्त होण,पोट साफ न होण,अपचन,बध्दकोष्ठता, उष्णता वाढण असे अनेक प्रकारचे त्रास एरंडेल तेल प्यायल्याने बरे होतात.हे तेल पहाटे घेण अत्यंत फायदेशीर ठरत.या तेलाचा ओशटपणा,ढेकर येण हे त्रास टाळण्याकरिता ते सकाळी लवकर अनुशापोटी घेतल्यास फायदा होतो.हे तेल इतक गुणकारी आहे की,ज्याना वारंवार पोट फुगणे,गच्च झाल्यासारख वाटत,पोट साफ होत नाही असे त्रास होतात.या त्रासांमुळे हृदयविकार उध्दभवण्याची शक्यता असते,हे त्रास वेळच्या वेळी थांबवायचे असतील तर आयुर्वेदात एरंडेल तेल पिण्याचा सल्ला दिला जातो.हे तेल शरद आणि वसंत  ऋतूत घ्यावे.         
वसंत ऋतूत उष्णता वाढलेली असते.यामुळे ऋतू नुसार शरीरात होणाऱ्या बदलांना सामोर जाण्यासाठी आणि प्रकृतीत होणारे त्रास टाळण्यासाठी एरंडेल तेल प्यायल्यास आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात. पोट साफ होण्यासाठी बरेच जण वेगवेगळ्या चुर्णाचा वापर करतात.यावर एरंडेल तेल प्यायल्यास फायदेशीर ठरते.कोठा साफ होण्याकरिता वर्षातून दोन वेळा तरी शरद आणि वसंत ऋतूत एरंडेल तेल पिण्याचा सल्ला वैद्य देतात. 

कस घ्याल ?                                                      सकाळी रिकाम्या पोटी एरंडेल तेल प्यायल्यास शरीराला लागू पडत, असे आयुर्वेदात सांगितले आहे.एरंडेल तेल पिताना पोट थोड रिकाम ठेवाव.भरपेठ खाल्यानंतर एरंडेल तेल घेऊ नये.प्रौढानी मात्रा म्हणजे वय वर्षे २० ते ८० वर्षापर्यत ३० मिली घ्यावे.रात्रीच्या वेळी शक्यतो अत्यंत कमी किंवा हलका आहार घ्यावा.गरम पाणी,गरम चहा किंवा लिंबू पाणी, ताक यातूनही एरंडेल तेल घेतल तरी चालत.एरंडेल तेल प्यायल्यानंतर तेलाच्या ओशटपणाचा तोंडाला आलेला त्रास जाण्यासाठी कोकम किंवा आमसूल घ्यायला हरकत नाही.