NC Times

NC Times

जम्मू काश्मीर मध्ये गलाई बांधवांनी जय महाराष्ट्र गणेश मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख) -जम्मू काश्मीर मध्ये महाराष्ट्रातील  गलाई बांधवांनी शिवजयंती मोठ्या  उत्साहात साजरी  केली असुन कामानिमित्त गलाई बांधव जम्मु काश्मीर येथे स्थायीक असुन त्यांना शिवजयंती साजरा करण्यासाठी  आपल्या  मायभुमीत येवुन शिवजयंती साजरा करणे शक्य न झाल्याने  आपल्या मायभुमीतील शिवप्रेमीनी एकत्र  येवुन  बाजार जम्मू येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी  मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली असुन यावेळी उपस्थित शिवप्रेमी विक्रम बाबर विजय चव्हाण अजय किर्दत राजाराम भोसले मुसाजी शेख अविनाश सरगर मारुती जाधव रवी जाधव तसेच शिवभक्त व जम्मु काश्मीर मधील शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.