NC Times

NC Times

महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, मेडिकल रिपोर्ट आले समोर


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन) : उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यात भाजप आमदाराने केलेल्या गोळीबाराच्या घटनेने राजकीय वातावरणही तापलं आहे. कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे जखमी झाले आहेत. महेश गायकवाड यांना ६ गोळ्या लागल्या असून त्यांच्यावर रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.