नवचैतन्य टाईम्स सातारा (दिलीप भुणगे)
विठुमाऊली माऊली... माथ्यावर तुझीच साऊली डोळ्यामध्ये पाणी मुखी तुझी गाणी रात असो पहाट धरी पाय वाट हाती घेऊन टाळ सोडुनी स्वार्थाचा मळ तुझ्या दर्शनाचा लोभी कासावीस मन शोधी पांडुरंग पांडुरंग.... रंगुन तुझ्या भक्तीत दंग माफ कर लेकुराला तुझ्याच भक्तीचा भुकेला