NC Times

NC Times

ग्रंथ संपदा


नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)          भावार्थ अनुभवामृत ग्रंथातील ओवी निरूपण:-

क्रमश:
ओवी क्रमांक:- २७

आदिमध्यांतरहित गुरु | तेथ मना नव्हे अधिकारू |
म्हणोनि आदिमध्यांत निवृत्येश्वरू | अद्वयत्वे वंदिला ||२७||

सरळ अर्थ:-
जो आदी-मध्य-अंतरहित गुरु म्हणजे मोठा आहे तेथे मनालाही पोहचण्याचा अधिकार नाही. म्हणूनच तो आदी-मध्य-अंतरहित निवृत्तिस्वरूप ईश्वर आहे. तो मी स्वतः त्याच्यात एकरूप होऊन अद्वयत्वाने वंदिला.

भावार्थ:-
ज्याला आदी म्हणजे सुरवात, मध्य आणि अंत म्हणजे शेवट, हे तीनही नाहीत असा जो, गुरु म्हणजे सर्वांहून मोठा आणि व्यापक परमात्मा आहे त्या परमात्मस्वरूपाचे ठिकाणी मन पोहोचूच शकत नाही. म्हणजे मनाला त्या स्वरूपात प्रवेश करण्याचा अधिकारच नाही म्हणूनच ज्याच्या स्वरूपात आदी, मध्य, अंत हे तीनही नाहीत म्हणजेच तो या तीन अवस्थांपासून निवृत्त आहे असा जो निवृत्तिस्वरूप ईश्वर त्या निवृत्येश्वराला मी त्याच्या स्वरूपात एकरूप होऊन, स्वतःच्या ठिकाणी स्वत्वाचे कोणतेही द्वैत न ठेवता त्याच्यामध्ये एकरूप होऊन, अद्वैतरूपाने वंदन केले. म्हणजेच परब्रह्मस्वरूप श्रीगुरु निवृत्तिनाथांना अभेदरूपाने वंदन केले आहे. ||२७||
__गुरुवर्य श्रीकृष्णकृपांकित🙏🏻🌸🌷
रामकृष्णहरि🙏🏻🌸🌷