NC Times

NC Times

आरोग्यावर बोलू काही

 
नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)                                                    चमेलीचे आयुर्वेदिक फायदे ....... आम्लपित्तामुळे किंवा उष्णतेमुळे जीभेला वा तोंडात छाले निर्माण होण्याचा त्रास अनेकांना होत असतो.त्यामुळे तिखट खारट खाल्ले की खूप त्रास होतो.काहीही लावले तरीही आराम पडत नाही अशावेळी चमेली पानांचा काढा करुन तोंडात धारण करावा लगेच आराम पडतो.चमेली पानं वाटून व्रणांवर लावावे.दात दुखत असतील तर चमेली पत्र चावावीत...........चमेली पाने उत्तम व्रणरोपक म्हणजेच जखमा भरुन काढते.चमेलीपत्रसिध्द तेल लावावे.चमेलीपत्र कुष्ठघ्न आणि कण्डूघ्न सांगितले आहे.शरीरावर खाज सुटत असेल किंवा त्वचारोग उदा.एक्जीमा,फंगल इन्फेक्शन इ.मध्ये चमेलीपत्रसिध्द तेल अथवा पानांचा मूळाचा लेप लाभदायक ठरतो..........डोकेदुखी असेल तर चमेलीच्या मूळांचा काढा करुन त्याचा परिषेक करतात शिरःशूल चक्कर येणे अथवा मानसिक दौर्बल्यात चमेली तेलाने डोक्याला मालिश केल्याने आराम मिळतो.
 तळपायाला भेगा पडतात अशावेळी चमेलीची पाने वाटून लेप भेगांवर लावावा जखमा लवकर भरतात चमेलीपत्र सिद्ध तेलाने हळूहळू मालीश करावी त्यामुळे तळपाय पुन्हा मऊ व प्राकृत होतात........कान दुखणे कानात स्राव निघणे अशा तक्रारीवर पानांनी सिध्द तेल कानात टाकल्यास त्रास कमी होतो........मासिक स्राव व्यवस्थित होत नसेल किंवा अवरोध असेल तर पत्र व पुष्प लेप ओटीपोटावर लावतात.........,अतिकाम किंवा कमी झोप यामुळे चिडचिडेपणा मानसिक अस्वस्थता जाणवते.अशावेळी चमेलीच्या फुलांचा सुगंध घेतल्यास ट्रेस कमी करण्यास मदत होते.अरोमाथेरपी प्रमाणे याचा उपयोग होतो.चमेली पुष्प वाजीकर आहेत.या फुलांचा सुगंध वाजीकरण करणारा आहे.
 रक्तविकारांवर चमेली खूप प्रभावी कार्य करते.अनेक औषधी कल्पांमध्ये चमेलीचा वापर करण्यात येतो.जात्यादी तेल जात्यादी घृत इ.चमेली वापरुन केलेली औषधी कल्प आहेत.गंडूष चिकित्सा,लेप,कवलधारण,मालीश तसेच आभ्यंतर सेवनाकरिता वैद्य चमेली कल्पांचा वापर करतात.अशी ही चमेली उत्तम त्वक् रोगहर मुखरोगहर व्रण रोपक व याची फुले उत्तम वाजीकर व सौमनस्यजनन करणारे.