NC Times

NC Times

वाघोलीच्या उपसरपंचपदी प्रदीप शिंदे यांची बिनविरोध निवड


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- वाघोली (ता कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रदीप शिवाजी शिंदे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंच साधनाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.तर यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक विजयकुमार ठोंबरे यांनी काम पाहिले. 
         मावळते उपसरपंच दतात्रय आठवले यांना ठरवून दिलेल्या कार्यकाळ संपल्यांने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.या रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी प्रदीप शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने सर्वानुमते त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. 
      यावेळी सरपंच सौ साधनाताई शिंदे,मावळते उपसरपंच दतात्रय आठवले,ग्रामसेवक विजयकुमार ठोंबरेसह सर्व ग्रामपंचायत सदस्य,गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी त्यांच्या समर्थकांनी गुलालाच्या उधळणीसह फटाक्यांची आतिषबाजी करत एकच जल्लोष केला.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नुतन उपसरपंच प्रदीप शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. 
         यावेळी सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित उपसरपंच प्रदीप शिंदे म्हणाले की सर्व सदस्यसह ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार आसल्याचे सांगितले.