NC Times

NC Times

"साहित्यातून युवकांनी आत्मपरीक्षण करावे"....


नवचैतन्य टाईम्स वाई (अमोल मांढरे) वाई.16 फेब्रुवारी.आजकालच्या तरुण पिढीला कदाचित हा लेख म्हणजे एक नवलच अथवा हास्यास्पदच वाटेल. परंतु हा लेख उद्याच्या भविष्यातील आधारस्तंभ असलेल्या तरुण पिढीसाठी प्रबोधनात्मक आणि विशेष आहे. आज आपण 21 व्या शतकात वावरत आहोत. आज सर्वत्र आधुनिकरण, वाढते शहरीकरण असल्यामुळे सर्वांचे जीवन एक स्पर्धात्मक आणि जलद गतीची झालेले आहे. विशेषतः तरुण वर्गाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. आज सर्वत्र इंटरनेट, मोबाईल, यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पूर्वी संपर्कासाठी काही तास  परिस्थिती असताना आता क्षणार्धात आपण हजारो किलोमीटरवर संपर्क साधू शकतो. परंतु याचा मुख्य परिणाम विद्यार्थी वर्गाच्या शैक्षणिक क्षेत्रात झालेला दिसून येतो. पूर्वी विद्यार्थ्यांचे करिअर साठी काही मोजकीच क्षेत्रे प्रामुख्याने होती. परंतु आज तरुण वर्गासाठी नवनवीन आणि आव्हानात्मक शेकडो करियर चे क्षेत्रे आव्हानात्मक म्हणून ठाण मांडत आहे. परंतु याचा सखोल परिणाम तरुण वर्गाच्या जीवनशैलीत, आणि त्यांच्या दररोजच्या घडामोडीत झालेला दिसून येतो. परंतु याचा नकारात्मक परिणाम जी आपली भारतीय संस्कृती ज्याचा आदर्श सबंध जगामध्ये आहे. त्यावर दिसून येते आहे. ही खरोखरच आपल्या समाजासाठी ही गंभीर आणि विचार करण्याजोगी बाब आहे. तेव्हा आजच्या तरुण वर्गाने साहित्याकडे वळून स्वतःच्या व्यक्तीमत्वाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास करावा. आज आपल्या समाजातील यशस्वी व्यक्ती त्याच बरोबर आपल्याला आदर्श असणाऱ्या महापुरुषांच्या यशस्वी जीवनाचा पाया  हा वाचन संस्कृतीत 
अर्थातच साहित्य क्षेत्रातच होता.
आपल्याच वाचन संस्कृतीतून फार मोठे ज्ञान, थोर विचार यांचा सार लपलेला आहे. शिक्षण आणि वाचनाने माणूस परिपूर्ण आणि समृद्ध होतो. हेच आपले इतिहासातून आणि पर्यायाने आत्ताच्या थोरांचे शिकवणुकीतून स्पष्टच होते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा  साहित्य क्षेत्राशी जवळून संबंध येतो. परंतु विशिष्ट कॉलेजवयीन अथवा त्यापुढच्या तरुण वर्गाचा साहित्य क्षेत्राशी संबंध दिसून येत नाही. त्यामुळे त्यांची वैचारिक नुकसान होत आहे. आपल्या मराठी साहित्यात विशेष विविध महापुरुषांचे आत्मचरित्र, संतांचे ग्रंथ ,काव्य यातून मिळणारी ऊर्जा ही शेकडो वर्षापासून आजही टिकून आहे. आणि हीच ऊर्जा जन माणसांसाठी संकटांशी लढण्यासाठी एक संजीवनीच आहे. तेव्हा  आपण सर्व पत्रकार बांधवांनी आपल्या लेखणीतून तरुण वर्गाला साहित्य क्षेत्राशी परिचय करून देणे हे आद्य कर्तव्यच आहे. त्यामुळे भविष्यात इतर कोणत्याही क्षेत्रात असली तरी तेथे त्यांनी यशस्वी होण्यासाठी नक्कीच शारीरिक व मानसिक पाठबळ नक्कीच मिळेल.
यामध्ये तिळमात्र शंका नाही. सध्या शहरी भागातील तरुण वर्गाबरोबरच ग्रामीण भागातील तरुण वर्गही स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत येताना दिसत आहे. तेव्हा प्रत्येक गावात ग्रंथालय उभारणे ही संकल्पना नक्कीच तरुण वर्गाच्या विकासासाठी नक्कीच सकारात्मक ठरेल. त्याचबरोबर शहरी भागातील तरुण वर्गासाठीही कवी संमेलन, व्याख्यानमाला, आणि साहित्य संमेलन यामार्फत साहित्य क्षेत्राकडे तरुण वर्गाचे आकर्षण नक्कीच वाढेल. त्याचबरोबर तर वर्गाची बौद्धिक क्षमता याचा नक्कीच विकास होईल आणि जीवनातील इतर संकटांशी सामना करण्यासाठी त्यांचे धैर्य नक्कीच वाढेल. सध्याच्या तरुण वर्गात व्यसनाधीनता, गुन्हेगारी त्याचबरोबर निराशेतून आत्महत्या अनेक नकारात्मक बाबींचे प्रमाण वाढलेली दिसून येत आहे. तेव्हा याचा सामना करण्यासाठी तरुण वर्गामध्ये साहित्य क्षेत्राची आवड वाढवून, त्यांच्यामध्ये प्रबोधन होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सध्याची तरुण वर्ग शैक्षणिक क्षेत्र बरोबर इतर क्षेत्राकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यासाठी साहित्य क्षेत्रामुळे कला-संस्कृती, आरोग्य, समाजकार्य, राष्ट्रहित अशा विविध क्षेत्रांशी ओळख वाढून त्यांचे व्यक्तिमत्त्व नक्कीच वाखाणण्या जोगे होईल. आज विविध शाखेची महाविद्यालय, कल चाचणी, प्रवेश परीक्षा या सर्वांनी विद्यार्थ्यांना आपल्याकडे ओढण्याची जणू स्पर्धाच निर्माण झालेली आहे. शैक्षणिक क्षेत्राचे नुकसान होत तरुण वर्गासाठी एक नकारात्मक बाब आहे. आजचा तरुण वर्ग कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असल्या तरी साहित्य क्षेत्राशी त्यांनी स्वतःची नाळ कायमच जोडलेली असेल, करते त्या क्षेत्रात नक्कीच यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करतील. शिक्षणाने माणूस परिपूर्ण व्यक्तिमत्वाचा घडतो. हे आजच्या तरुण वर्गाने हे मनात ठरवून घ्यावे. तरुण वर्गणी लक्षात घेण्यासारखे गोष्ट म्हणजे एखादा व्यक्ती शारीरिक दृष्टीने किती हा मजबूत असला तो तितकाच मानसिक दृष्ट्या योग्य हवा. तरच तो त्याच्या जीवनात यशस्वी होईल. तेव्हा केवळ याच क्षेत्रात  आजच्या तरुण पिढीला आपला अन्नदाता बळीराजा, आपले वीर जवानांचे महात्म्य, त्याचबरोबर स्वतःबरोबर शासनाची जबाबदारी, आपल्या इतिहासाची जाण, गुरुची शिकवण आणि थोरांचा आदर, या सर्वांचे महत्त्व नक्कीच कळेल आज माझ्या साहित्य क्षेत्रातील सहकाऱ्यांना जाणवलीच असेल की इतर क्षेत्रांबरोबरच साहित्य क्षेत्रातही आता प्रतिष्ठा आणि सन्मान मिळालेला दिसून येतो. त्याचबरोबर सोशल मीडिया, व्हाट्सअप, आणि युट्युब या साधनांमधून सुद्धा साहित्य क्षेत्रात बरेच लोक जोडलेले दिसून येत आहेत. परंतु हे सर्व करताना एक  गांभीर्याने लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे साहित्य क्षेत्रात केवळ प्रतिष्ठा किंवा पैसा याच्या प्रलोभनाला बळी न पडता स्वतःबरोबरच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले कर्तव्य जाणून साहित्यिकांनी कार्यरत राहावे. आज आपल्या सर्व साहित्यिकांची एक जबाबदारीच आहे की साहित्य क्षेत्रांमधून घडलेला युवक वर्ग हा भविष्यात देशाचे आधारस्तंभ नक्कीच होताना दिसत आहे. आज आपण पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाला बळी न पडता आपली आदर्श व भारतीय संस्कृतीचे पावित्र्य कायम ठेवणे ही साहित्यिकांची जबाबदारीच आहे.. आणि हेच आपल्या राष्ट्रहितासाठी एक योग्य पाऊल असेल. तेव्हा आजच्या चर्चेतून आपल्या तरुण वर्गाने साहित्याकडे वळावे याचे महत्त्व कळलेच असेल.. धन्यवाद.
कविराज अमोल मांढरे वाई .जिल्हा सातारा.
Mobile no.7709246740.