NC Times

NC Times

जत ते चडचण महामार्गावर म्हैशाळच्या पाण्यासाठी चक्काजाम आंदोलन वाहतूक सेवा विस्कळीत


नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी)
माडग्याळ येथील नागरिकानी म्हैशाळ योजनेचे काम त्वरीत सुरु करण्यात यावी यासाठी जत चडचण महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आली असुन म्हैशाळ योजनेपासुन वंचित असणाऱ्या ६५ गावांना विस्तारीत योजनेतुन पाणी द्यावे यासाठी ग्रामस्थानी रास्ता रोको आंदोलन केले सकाळी ९ वाजता ग्रामस्थानी व शेतकऱ्यांनी रस्त्यावर  उतरले मुख्य चौकात रास्ता रोको झाल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती मात्र या भागात सकाळी दुध संकलन होते.आंदोलनाच्या वेळी केवळ दुधाची वाहने सोडण्यात आली.रास्ता रोको आंदोलनात माजी सरपंच विठ्ठल निकम,उपसरपंच बाळासाहेब सावंत सदस्य  महादेव माळी व माडग्याळ परिसरातील ग्रामस्थ शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.