NC Times

NC Times

हरोली येथील तलाठी श्रीमती प्रतिभा लोंढे व कोतवाल प्रविण मोरे लाचलुचपतच्या जाळ्यात

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी 
लोकसेवक श्रीमती, प्रतीभा गणपती लोंढे, तलाठी हरोली, ता. कवठेमहांकाळ, व श्री. युवराज ऊर्फ प्रविण रामचंद्र मोरे, कोतवाल बनेवाडी ता. कवठेमहांकाळ यांना ३,५००/- रुपये लाच स्विकारले नंतर रंगेहात पकडले सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

तक्रारदार यांचे वडोल व चुलती यांनी त्यांचे वडिलोपार्जित जमीनचे सरसनिरस वाटणी बाबत दुय्यम निबंधक कार्यालय कवठेमहांकाळ या ठिकाणी रजिस्टर दस्ताने वाटणीपत्र केले असुन सदर दस्ता वरुन ७/१२ सदरी नावे नोंद होणे करिता तक्रारदार यांचे वडीलांनी तलाठी कार्यालय हरोली येथे अर्ज दाखल केलेला होता. सदर वाटणीपत्रा वरुन ७/१२ सदरी नोंद घेवून ७/१२ उतारा देणेकरीता लोकसेवक श्रीमती, प्रतिभा गणपती लोंढे, तलाठी हरोली, ता. कवठेमहांकाळ, व श्री. युवराज ऊर्फ प्रविण रामचंद्र मोरे, कोतवाल बनेवाडी ता. कवठेमहांकाळ यांनी तक्रारदार यांचेकडे ३,५००/- रूपये लाच मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी ०८/०२/२०२४ रोजी अॅन्टी करप्शन ब्यूरो सांगली पथकास दिला होता.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक ०८/०२/२०२४ रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये श्रीमती प्रतिभा गणपती लोंढे, तलाठी हरोली, ता. कवठेमहांकाळ, व श्री. युवराज ऊर्फ प्रविण रामचंद्र मोरे, कोतवाल बनेवाडी ता. कवठेमहांकाळ यांनी तक्रारदार यांचे वाटणीपत्रा वरुन

७/१२ सदरी नोंद घेवून ७/१२ उतारा देणेकरीता ३,५००/- रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दि.०९/०२/२०२४ रोजी तलाठी कार्यालय, हरोली या ठिकाणी सापळा लावला असता श्रीमती. प्रतिभा गणपती लोंढे, तलाठी हरोली, ता. कवठेमहांकाळ, व श्री. युवराज ऊर्फ प्रविण रामचंद्र मोरे, कोतवाल बनेवाडी ता. कवठेमहांकाळ यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून ३,५००/- रूपये लाच

रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने लोकसेवक श्रीमती, प्रतीभा गणपती लोंढे, तलाठी हरोली, ता. कवठेमहांकाळ, व श्री. युवराज ऊर्फ प्रविण रामचंद्र मोरे, कोतवाल बनेवाडी ता. कवठेमहांकाळ यांचेविरुध्द कवठेमहांकाळ पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

सदरची कारवाई मा. श्री. अमोल तांबे सोो पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक, श्री. विजय चौधरी सोो, अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संदीप पाटील, पोलीस उप अधीक्षक, पोलीस निरीक्षक, श्री. दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक श्री. विनायक भिलारे, पोलीस अंमलदार धनंजय खाडे, सीमा माने, चंद्रकांत जाधव, ऋषीकेश बडणीकर, प्रितम चौगुले, अजित पाटील, रामहरी वाघमोडे, सलीम मकानदार, पोपट पाटील, उमेश जाधव, सुदर्शन पाटील, चालक बंटमुरे यांनी केली आहे.

नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, बदाम चौक, सांगली, येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२३३/२३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अॅप नंबर व मोबाईल नंबर ९८२१८८०७३७ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आली आहे.