NC Times

NC Times

कवठेमहांकाळ येथे वैद्यकीय क्षेत्रातील गुणवंताचा सत्कार

 
नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर :-(जालिंदर शिंदे) कवठेमहांकाळ येथे स्व भीमसेन बाळाप्पा जमगे यांच्या स्मृती प्रितीर्थ कृरुदीन शेट्टी कोष्टी समाजाच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसिद्ध धन्वंतरी जे डी म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्यासह कोष्टी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रम हा वीरभद्र मंदिरात संपन्न झाला.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.तदनंतर वैद्यकीय क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 
        गुणवंत विद्यार्थ्यां मध्ये सर्वश्री डॉ शिवाणी मंगवडे (बीएच एम एस), डॉ स्वेता कोष्टी (बीडीएस),गुरुदेव जमगे (एमबीबीएस) यांचा समावेश आहे.यावेळी बोलताना डॉ जे डी म्हेत्रे म्हणाले की वैद्यकीय क्षेत्राला ईश्वरीय सेवा क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते.त्यामुळे नवोदित डॉक्टरांनी मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून आपले वैद्यकीय काम करावे असे आवाहन केले.तर भारत जमगे यांनी आपल्या प्रास्ताविकात पाहुण्यांचा व सत्कार मुर्तींचा परिचय करून दिला. 
         यावेळी सचिन जमगे,संजय नागजे,कैलास जमगे,बंडू रोकडे,डॉ बसवेश्वर म्हेत्रे,सौ शामल कोष्टी,जयश्री जमगे,भालचंद्र कोष्टी,आरविंद तुपचे,बाबासाहेब जमगे,रविंद्र जमगे,विलास जमगेसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत व प्रस्तावित भारत जमगे यांनी तर आभार बाबासो मंगवडे यांनी मानले.