NC Times

NC Times

पद्मश्री डॉ. ग.गो. जाधव. मुक्त द्वार ग्रंथालय वाई येथे शिवजयंती निमित्त मासिक मातृ रक्षा आणि स्पर्धा वार्ता अंक सप्रेम भेट


नवचैतन्य टाईम्स वाई (अमोल मांढरे) वाई.20 फेब्रुवारी. नमस्कार.आज वाई येथील पद्मश्री डॉक्टर ग गो जाधव. मुक्त द्वार ग्रंथालय येथे शिवजयंती निमित्त लेखक कविराज अमोल मांढरे. यांनी मातृ रक्षा मासिक आणि स्पर्धा वार्ता साप्ताहिक अंक हे सप्रेम भेट दिले आहे..तेथील ग्रंथपाल आदरणीय गाडे सर. यांच्याशी या अंकांमधील त्यांचे स्वलिखित लेखांची सविस्तर चर्चा केली आहे. या मातृरक्षा अंकात अमोल मांढरे यांनी. त्यांचा स्वलिखित छत्रपती शिवाजी महाराज चरित्र दुनिया मे भारत वर्ष के आदर्श प्रतिष्ठान. हा उत्कृष्ट हिंदी लेख प्रकाशित केला आहे. त्यांच्या येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी वर्ग अभ्यासिकेमध्ये येतात . तेथील ग्रंथपालांनी विद्यार्थी वर्गांना आपले हे लेखसंग्रह दाखवून नंतर या ग्रंथालयामध्ये हे अंक वाचकांना बहुमूल्य आणि वैचारिक दृष्ट्या मार्गदर्शनपर असून ते ग्रंथालयात ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. कविराज अमोल मांढरे यांच्यातील लेखकाला ओळखून तेथील ग्रंथपाल सरांनी त्यांना स्पर्धा परीक्षा अभ्यासिका मधील येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केलेले आहे.लेखक कविराज अमोल मांढरे.यांच्या लेखणीतून घडलेली विविध सामाजिक प्रबोधन पर, सामाजिक विषयांवर परिपूर्ण अभ्यास करून विशेष लेखांची
मालिका या मातृ रक्षा मासिक आणि स्पर्धा वार्ता साप्ताहिकांमध्ये समावेश आहे. आपल्या देशाला असलेल्या विविध महापुरुषांचा आदर्श व थोर विचार, संतांच्या वैचारिक ग्रंथांचे महत्त्व, युवकांसाठी वैचारिक प्रबोधन, विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण देणे, आपला बळीराजा आणि वीर जवानांचे महात्म्य, आजच्या नव्या पिढीसाठी स्पर्धा परीक्षांचे आव्हान, महाराष्ट्र राज्याला असलेल्या सहकाराचा आदर्श, जागतिक स्पर्धेत आव्हान कायम ठेवून आपल्या मातृभाषेचे ही संवर्धन, परराष्ट्र धोरणाचे महत्त्व, शहरीकरणाबरोबर ग्रामीण भागाचा ही महत्त्वपूर्ण विकास, वाढते शहरीकरणात पालकांचे कर्तव्य, यशस्वी विद्यार्थ्यांबरोबर अपयशी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श चरित्राचा अभ्यास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वपूर्ण कार्य, धर्मवीर संभाजी महाराजांचे थोर बलिदान आणि स्वराज्यासाठी पराक्रम. त्याचबरोबर सहकार क्षेत्रात देशात अग्रेसर असलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उत्कृष्ट कार्य प्रणाली. शहराबरोबरच ग्रामीण भागातही सहकार क्षेत्राचे कार्य, पत्रकारिता युवकांसाठी एक आव्हानात्मक क्षेत्र, स्वच्छ कारभारासाठी लोकसहभागातूनच विकास, जागतिक पर्यावरणाचे महत्त्व आणि संवर्धन,आम्हाला अभिमान आमच्या महाराष्ट्राचा, दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र, साहित्यिक व पत्रकारांना शासनाबरोबरच जनमानसांचाही पाठिंबा. भारतीय युवाशक्तीचे महान कार्य, पंढरीच्या वारीची महाराष्ट्राची थोर परंपरा, एमआयडीसीतील असंघटित कामगारांचे प्रश्न. वर्तमानपत्राचे सध्याचे स्थान, ऑलम्पिक मध्ये आपल्या भारताचे स्थान, क्रिकेट बरोबर इतर खेळांनाही महत्त्व द्यावे, भारतीय संस्कृतीचा जगात असलेला आदर्श. अशा विविध लेखांची मालिका असलेले हे मासिक व साप्ताहिक लोकप्रिय आणि आदर्श असेच आहे. यासाठीच लेखक कविराज अमोल मांढरे यांनी मातृ रक्षा परिवाराचे आणि त्यांच्या सर्व वाचकांचे  आभार मानले आहेत. तरी आपण सर्वांनी  मातृ रक्षा मासिक आणि स्पर्धा वार्ता साप्ताहिक नियमितपणे वाचावे. हा लेखसंग्रह वाचून आपला अभिप्राय लेखकाला जरूर कळवावा. असे मत लेखक कविराज अमोल मांढरे यांनी मांडले आहे. आणि लेखक कविराज अमोल मांढरे यांनी मातृ रक्षा मासिक परिवाराचे मनस्वी आभार मानले आहेत. आणि त्यांच्यातील लेखकाला एक सोनेरी संधीच देऊन अंतर्मनातील विचार व समाजप्रबोधनासाठी निपक्ष व निर्भीडपणे कार्यरत आहे. आणि सर्वच विद्यार्थ्यांनी हे मासिक आणि साप्ताहिक आपल्याला उत्तम मार्गदर्शन देतीलच त्यासाठीच त्यांनी हे अंक नियमित वाचावे अशी विनंती केलेली आहे..
धन्यवाद..
भारत माता की जय.
 भारत माता की जय.
.. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र..
कविराज अमोल मांढरे.वाई. जिल्हा सातारा.
Mobile no.7709246740.