NC Times

NC Times

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके यांची आज पुण्यतिथी...!


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब  काळे)
भारतीय सिनेमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांची आज पुण्यतिथी. भारतात सिनेमाची मुहूर्तमेढ यांनी रोवली आणि आता सिनेसृष्टी भव्यदिव्य झाली आहे. दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1870 साली नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक येथे झाला.
फाळके यांनी...
1913 साली राजा हरिश्र्चंद्र नावाची फीचर फिल्म* तयार केली. सिनेमाचे जन्मदाता दादासाहेब फाळके यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी...

दादासाहेब फाळके यांचे पूर्ण नाव धुंधिराज गोविंद फाळके असे होते.
दादासाहेब फाळके प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि स्क्रीनरायटर होते.
त्यांनी आपल्या 19 वर्षांच्या करिअरमध्ये 95 सिनेमे आणि 27 शॉर्ट फिल्म्स केल्या.

'द लाइफ ऑफ क्रिस्ट' हा मूकपट त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्यांना आपणही सिनेमा बनवावा असे वाटू लागेल आणि आपल्या पत्नीकडून पैसे उधार घेऊन त्यांनी पहिला मूकपट बनवला.

राजा हरिश्र्चंद्र हा त्यांचा पहिला सिनेमा असून त्याचे बजेट 15 हजार रुपये इतके होते.

महिलांना सिनेमात काम करण्याची संधी दादासाहेब फाळके यांनी दिली. भस्मासूर मोहिनी या सिनेमात त्यांनी दोन महिलांना काम करण्याची संधी दिली. दुर्गा आणि कमला अशी त्या दोन महिलांची नावे होती.

सेतुबंधन हा दादासाहेब फाळके यांचा शेवटचा मूकपट होता. त्यांचे निधन 16 फेब्रुवारी 1944 साली नाशिक येथे झाले.

भारतीय सिनेमात दादासाहेब यांच्या अभूतपूर्व योगदानामुळे 1969 साली भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा सुरु केला.

भारतीय सिनेमा जगतातील हा सर्वोच्च आणि प्रतिष्ठीत पुरस्कार मानला जातो.

स्वप्नपूर्तीसाठी प्रतिकूल परिस्थिती देखील सातत्याने प्रयोग करत राहण्याची त्यांची वृत्ती येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

1908 मध्ये त्यांनी लोणावळ्याला 'फाळके एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग प्रेस (वर्क्स)' ही संस्था सुरू केली. 1909 मध्ये दादासाहेब जर्मनीहून तीनरंगी मुद्रणप्रक्रियेचे अद्ययावत तांत्रिक शिक्षण घेऊन भारतात परतले व ही संस्था त्यांनी भरभराटीस आणली. पण व्यवसायातील भागीदारांबरोबर बेबनाव झाल्यामुळे ते वेगळे झाले (1911). यामुळे दादासाहेब उद्विग्न होते. याच दरम्यान त्यांनी मुंबईमध्ये लाईफ ऑफ जिझस ख्राईस्ट (म. शी. 'ख्रिस्ताचे जीवन') हा मूक चित्रपट पाहिला आणि त्यांच्या आयुष्यातले ध्यासपर्व सुरू झाले.

स्वदेशी चित्रपट बनवायचा या विचाराने त्यांना झपाटून टाकले. मुंबई (दादर) येथे फाळके चित्रपटनिर्मितिगृहाची स्थापना केली आणि सहा महिन्यात मुंबईच्या कोरोनेशन चित्रपटगृहामध्ये त्यांनी निर्मिलेला 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय बनावटीचा मराठी पूर्ण बोलपट प्रदर्शित झाला (3 मे 1913). राजा हरिश्चंद्रच्या यशाने खर्‍या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टीचा एक व्यवसाय म्हणून पाया रचला गेला. या चित्रपटानंतर त्यांनी 'मोहिनी भस्मासूर' (1913 ), 'सत्यवान सावित्री' (1914) या चित्रपटांची निर्मिती केली. 1917 मध्ये त्यांनी 'लंकादहन' हा चित्रपट प्रदर्शित केला. या चित्रपटाने उत्पन्नाचे पूर्वीचे सर्व विक्रम मोडले. अशा या प्रतिभाशाली व्यक्तिमत्वाचे 16 फेब्रुवारी 1944 रोजी निधन झाले.
दादासाहेब फाळके यांची आज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...