NC Times

NC Times

उन्हामुळे घाटमाथ्यावर अघोषित संचारबंदी,रस्ते ओस पडू लागले


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)  :- गेली आठ दिवसापासून कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असून उन्हापासून बचावासाठी जो तो गारवा शोधताना दिसत आहे.त्यामुळे घाटमाथ्यावरील रस्ते ओस पडू लागले आहेत.लोक घराबाहेर पडताना उन्हापासून रक्षण करण्यासाठी टोपी,गॉगल,मफलेरसह सुती कापड्याचा वापर करताना दिसत आहेत.दुपारच्या तीव्र उन्हामुळे लोक घरीच बसणे पसंत करीत आहेत. 
       बळीराजाही आपली शेतातील सर्व  कामेही अगदी सकाळी अथवा दुपारनंतर उरकताना आढळून येत आहे.घरोघरी वातानुकूलित यंत्राची घरघर ऐकू येत आहे.तर रस्त्याकडेला रसवंती गृहे,फळांचे स्टाॅल,आईस्क्रीमचे गाडे थाटले असुन तेथे गर्दी होताना दिसत आहे.गल्लोगल्ली आईस्क्रीमवाले कुलपीवाले,किरकोळ फळ विक्रेते फिरताना दिसत आहे.
         कवठेमहांकाळ शहरातील ही तहसील कार्यालय,पंचायत समिती आवार,कृषी कार्यालय,नगरपंचायत यासारख्या शासकीय कार्यालयातील गर्दीही उन्हामुळे रोडावली आहे.दुपारील तीव्र उन्हामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आहे.