NC Times

NC Times

No title

टॉवर लाईनचे काम तात्काळ थांबवा अन्यथा आत्मदहन करणार
       घाटनांद्रे-पाचेगाव सिमेवरील बळीराजाचा इशारा. 
घाटनांद्रे/वार्ताहर :- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील सुझलाॅन पवन ऊर्जा कंपनीच्या सबस्टेशन कडून आटपाडी तालुक्याकरीता नेहण्यात येणार्या उच्च दाबाची विद्युत वाहीनीचे खांब संबंधित शेतकर्यांची कोणतीही परवानगी न घेता ती पेराऊ शेतातून नेल्याने व ती अतिउच्च दाबाची वाहीनी असल्याने जीवितास निर्माण होत असल्याने ती तात्काळ काढण्यात यावी अन्यथा सुझलाॅन कंपनीच्या घाटनांद्रे सबस्टेशनच्या समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा माजी सैनिक सोन्याबापू बाबासाहेब ढेमरे (पाचेगाव बु) यांनी दिला आहे. 
       याबाबत पत्रकारांशी बोलताना ढेंमरे म्हणाले की माझी पाचेगाव-बु हद्दीतील गट नंबर ९०७/१ येथे पिकावू शेतजमीन आहे.या जमीनीच्या अगदी मध्यातून आम्हाला कोणत्याही प्रकारची पुर्व कल्पना न देता मॅनेजिंग डायरेक्टर मे एसी डी सी साईदिप बिलकॉन प्रा लि अश्विनी आपार्टमेंट पुणे-४१११०० या कंपनीने १३३ केव्ही च्या क्षमतेचे वीजेचे खांब रोवले आहेत.त्यामुळे भविष्यात आमच्या शेताचे फार मोठे नुकसान होणार आहे.संबंधित अधिकार्यांना शेताच्या एका बाजूने खांब नेहण्याची विनंती केली असता हे खांब येथुनच जाणार तुम्हाला कोठे जायचे तेथे जा आसे उर्मटपणाची उतरे दिली जात आहेत. 
       येथुन जाणारी विद्युत वाहीनी अगदी उच्च दाबाची असल्याने घरातील महिला व मुलांच्यात शेतात जाण्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यातच माझ्या शेतातून एकुण पाच खांब गेल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे.याविरुद्ध बोलल्यास सदर कंपनी कडून बळाचा वापर होत आहे.हे तात्काळ न थांबल्यास व संबंधित खांब माझ्या शेतातून पर्यायी जागेत न नेल्यास घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील सुझलाॅन कंपनीच्या सबस्टेशन समोर आत्मदहन करण्याचा इशारा सोन्याबापू बाबासाहेब ढेमरे यांनी दिला आहे. 
(फोटो ओळी :- घाटनांद्रे-पाचेगाव  सिमेवरील सोन्याबापू ढेमरे यांच्या पिकाऊ शेतातून गेलेली उच्च दाबाची विद्युत वाहीनी.)