NC Times

NC Times

सदगुरुच नाव घ्यायचं आणि शेतकऱ्यांना लुटायचं हेच राजेवाडी येथील कारखान्याचे काम -मा. गणेश जुगदर

नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजु शेख)
शेतकऱ्याच्या ऊसाला तीन हजार रुपये पहिली उचल मिळावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे खानापूर आटपाडी विधानसभा अध्यक्ष गणेश गुगदर यांनी मागील महिन्यापासून कारखान्या समोर आंदोलन सुरू केले आहे मात्र कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याची भूमिका कारखाना प्रशासनाने घेतली आहे

सदरचा कारखाना हा खाजगी मालकीचा आहे कारखान्याचे मालक यांचे संबंध धार्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्याशी संबंध आहेत सद्गुरु श्री श्री नावाने हा कारखाना सुरू केला आहे मात्र कारखान्याच्या मालकाचे वरिष्ठ पातळीवरती असलेले या संबंधांचा फायदा घेऊन शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचं काम या कारखान्याने सुरू केला आहे सामान्य शेतकरी जरी कुठे न्याय मागण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचे असा एकंदरीतच प्रकार चाललेला आहे असा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे



कारखान्याच्या समोर इतके दिवस आंदोलन सुरू असून सुद्धा कारखाना प्रशासनाने अद्याप आंदोलकांसोबत कसल्याही प्रकारची सकारात्मक चर्चा केलेली नाही सदरचा कारखाना हा सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यांमध्ये आहे आटपाडी तालुक्यातील प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी कारखान्याचे चेअरमन एन शेषगिरी राव यांच्याशी मोबाईल वरती संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र अनेक वेळा संपर्क करून सुद्धा चेअरमन नी साधा फोन सुद्धा उचललेलं नाही त्याचबरोबर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर यांच्याशीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र यांनीही फोन उचलण्याची तसदी घेतली नाही शेवटी प्रसार माध्यमचे प्रतिनिधी कारखान्यावरती पोहोचले मात्र या ठिकाणी कोणीही जबाबदार व्यक्ती हजर नव्हता या ठिकाणी प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांनी जाऊन कारखान्यातील सचिन खटके व सावंत या अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी या अधिकाऱ्यांनी या आंदोलनावरती तोडगा काढण्यासंदर्भात त्यांच्याकडे अधिकार नसल्याचं सांगितलं

राजेवाडी येथील सद्गुरु श्री श्री हा कारखाना वगळता सांगली जिल्ह्यामधील सर्वच साखर कारखाने 3000 रुपये च्या वर पहिली उचल देत आहेत मात्र हा कारखाना 2700 च्या पुढे उचल देण्यास तयार नाही 

कारखाना प्रशासनाची मनमानी विरोधात आता शेतकऱ्यांच्या अनेक संघटना या कारखान्याच्या विरोधात एक वटू लागले आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुद्धा या कारखान्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे 5 फेब्रुवारीला आंदोलन करणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितलं आहे


एकंदरीतच कारखाना मालकाकडून शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहायला जातोय मात्र जेव्हा शेतकऱ्याच्या संयमाचा बांध फुटेल तेव्हा काय होईल हे पाहण्यासाठी आपणास काही वेळ वाट पहावी लागणार आहे