NC Times

NC Times

किसन वीर कॉलेज वाई यांच्या वतीने कविराज अमोल मांढरे यांचा सत्कार सोहळा संपन्न



नवचैतन्य टाईम्स वाई (अमोल मांढरे)वाई.27 जानेवारी.
किसनवीर महाविद्यालय  येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनानिमित्त कॉलेजचे माजी विद्यार्थी
आणि साहित्यिक, पत्रकार कविराज अमोल मांढरे. यांना निमंत्रित केले होते. तेव्हा प्रभारी प्राचार्य सावंत सर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर त्यांचे वैचारिक मंथन हे स्वलिखित पुस्तकही तेथील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले आहे. त्याचबरोबर साहित्यिक कविराज अमोल मांढरे.यांचा परिचय मराठी भाषा विभाग प्रमुख आदरणीय श्री कांबळे सर यांनी तेथील उपस्थितांसमोर सादर केला. त्यांनी सांगितले की कविराज अमोल मांढरे हे आपल्या किसनवीर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचे शिक्षण बीए मराठी असे असून त्यांनी साहित्यिक व पत्रकारिता क्षेत्रात एक उत्तुंग शिखर सर केलेले आहे. आणि याच क्षेत्र त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र ओळख देखील निर्माण केलेली आहे.कवी संमेलना बरोबरच इतर सामाजिक प्रश्नांवरही त्यांनी महाराष्ट्रातील विविध वृत्तांत पत्रातून दर्जेदार लिखाणही केलेले आहे. त्याचबरोबर त्यांना अनेक साहित्य पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. तेव्हा अशा या गुणी माजी विद्यार्थ्याचा आपल्या कॉलेजच्या सर्व परिवाराला सार्थ अभिमानच राहील असेही श्री कांबळे सर म्हणाले. साहित्यिक कविराज अमोल मांढरे. यांनीही तेथील विद्यार्थ्यांसमोर आपली मातृभाषा मराठीचे महत्त्व व भविष्यातील संवर्धन याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आजची युवाशक्तीचे उद्याचे भविष्याचे आधारस्तंभ आहेत. याची जाण ठेवून त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.ते विद्यार्थ्यांना म्हणाले की आजच्या वाढत्या स्पर्धेत आणि जागतिकीकरणात तुम्ही कुठल्याही क्षेत्रात करिअर करून जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी आपली मातृभाषा मराठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श स्वराज्याची जाण कायम ठेवावी व त्याचे पावित्र्यही कायम राखावे. आणि विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन जीवन हा एक आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा असतो.

आणि विद्यार्थ्यांनीही महाविद्यालयीन जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आपल्या कृतीमुळे महाविद्यालयाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितले. आणि कॉलेजच्या प्रोफेसर यांनाही एक विनंती केली की, विद्यार्थ्यांमध्ये कुठलीही तुलना न करता त्यांची कल, क्षमता,आवड याचा अभ्यास करून त्यांना त्यांचे स्वतःचे करिअर निवडण्यास स्वातंत्र्य द्यावे. त्याचबरोबर भविष्यातही किसनवीर महाविद्यालया चे बहुमोल मार्गदर्शन आणि सहकार्य लाभेल ही सदिच्छा.कविराज अमोल मांढरे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. कवी राज अमोल मांढरे हे साहित्य क्षेत्राबरोबरच पत्रकारितेचे क्षेत्रातही उत्तम पद्धतीने कार्यरत आहेत. त्याचबरोबर हिंदी साहित्य क्षेत्रातही परराज्यातही त्यांचे समाजप्रबोधनाचे कार्य चालूच आहे. धन्यवाद.
कविराज अमोल मांढरे. वाई. जिल्हा सातारा.Mobile.no.7709246740.
.