NC Times

NC Times

आटपाडी तालुक्यात २६जानेवारी रोजी कुणबी दाखल्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन-मा.तहसिलदार सागर ढवळे


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी (राजु शेख)-आटपाडी तालुक्यात २६जानेवारी रोजी सर्व सेतु कार्यालयात कुणबी प्रमाणपत्रासाठी विशेष शिबीराचे आयोजन केल्याचे माहिती आटपाडीचे तहसिलदार मा.सागर ढवळे यांनी प्रसिद्धी पत्रकाध्दारे केली आहे. 



आटपाडी तालुक्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांना सुचना करण्यात आले आहेत.या कुणबी दाखल्या संदर्भात लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे देण्यासाठी २६ जानेवारी रोजी सर्व सेतू चालक यांना कार्यालय चालु ठेवण्यासदर्भात सुचना देणेत आले आहेत.


तसेच तहसिल कार्यालयातील अभिलेख शाखा व MAG शाखेस दाखल्या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना तहसिलदार यांचेकडुन देण्यात आले आहेत.