NC Times

NC Times

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शहापूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन



नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी(दिनेश लोंढे) कै शरद सकटे स्मृती प्रतिष्ठान व ग्रामपंचायत शहापूर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.छत्रपति शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, यांच्या विषयी विध्यार्थ्यानी अत्यंत चांगल्या प्रकारे भाषण केले.कु समॄध्दी राजेंद्र सकटे,अमॄता महेश सकटे,अमॄता जयवंत सकटे,अर्या अमर माने,परी लखन सकटे,आरव आनंदा सकटे, यांना विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमास श्री मधुकर सदाशिव माने सरपंच, उपसरपंच श्री राजेंद्र गुलाबराव सकटे, ग्रामपंचायत सदस्य सौ सारिका नवनाथ माने,सौ कोमल श्रीमंत माने,सौ सुनिता अरुण गायकवाड,सौ उषा देवी राजेंद्र माने, पोलिस पाटील श्री विजय काशिनाथ माने, श्री नवनाथ माने, श्री सुनील सकटे, श्री लक्ष्मण माने, विकास माने, अमोल जाधव, संतोष माने, राहुल माने, श्रावण गायकवाड, श्री लाला सकटे, नंदकुमार माने, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रजनी शिंदे, शिक्षिका उमा गाडे,जाधव मॅडम,गोडसे मॅडम, अंगणवाडी सेविका सौ जयश्री पवार,व माने मॅडम ,व शहापूर ग्रामस्थ उपस्थित होते.